'तुझ्या मामाने बोलावलंय, चल'; 16 वर्षांच्या मुलीला सोबत नेलं अन्..., वाशिममधील धक्कादायक प्रकार

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Washim Crime : पुण्यातील शिवशाहीचं प्रकरण ताजं असताना वाशिममधून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशिम रिसोड तालुक्यातील एका 16 वर्षांच्या शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेच्या प्रश्न उपस्थित झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीची ओळख पटली असून पीडित मुलीला घेऊन जातं असल्याचा सीसीटीव्हीदेखील समोर आलं आहे. आरोपीच्या शोधासाठी वाशिम पोलिसांनी आठ पथकं तयार केले असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येईल असं अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक लता फड यांनी सांगितल. तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीवर या आधी सुद्धा बलात्काराचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

नक्की वाचा - Nalasopara Crime: पोटच्या 3 लेकींचे लचके तोडले, एकीचा 5 वेळा गर्भपात; नराधम बापाची भयंकर विकृती!

27 फेब्रुवारी रोजी पीडिता कम्प्युटर क्लाससाठी जात होती. सोड शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील कम्प्युटर क्लास समोर जात असताना पीडितेला एका अनोळखी व्यक्तीनं तुझ्या मामाने बोलावल्याचं सांगितलं. मी तुझ्या दोन्ही मामांना ओळखतो असं त्याने पीडितेला मामांची नावंही सांगितली. तिथंच आरोपीने मामाशी फोनवर बोलत असल्याचं नाटक केलं.

Advertisement

ऑटो पॉईंटच्या दिशेने पायी जात असताना आरोपीने पीडितेला एका ज्यूस सेंटरमध्ये नेलं. तिथं ज्यूस प्यायल्यानंतर पीडितेला ऑटोमध्ये बसवून रिसोड ते सवडच्या दरम्यान एका निर्जन स्थळी नेलं आणि चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर एका निर्जन स्थळी नेत या व्यक्तीनं मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तिला त्याच ठिकाणी सोडून दिलं. त्यानंतर पीडिते मामा ज्या ठिकाणी काम करत होता तिथं गेली. पीडितेने रडत रडत मामाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मामानं मुलीच्या वडिलांना बोलावून पोलीस स्टेशन गाठलं. आणि तक्रार दाखल केली.