पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमधून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या मेहूणीची हत्या केली. हत्येनंतर त्याने मेहूणीचे धडावेगळं केलेलं शिर आणि तलवार हातात घेऊन गावात फेरफटकाही मारला. बिमल मंडल असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती पोलीस स्टेशन परिसरातील भरतगडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बिमल मंडल या व्यक्तीने आपल्या मेहुणीची हत्या करून तिचा शिरच्छेद केला. एवढेच नाही तर त्यानंतर एका हातात मेहुणीचे कापलेले डोके आणि दुसऱ्या हातात धारदार शस्त्र घेऊन तो रस्त्यावर फिरत होता. हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण घाबरुन गेले. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.
स्थानिक लोकांच्या मते, यावेळी आरोपी बिमल मंडलच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. त्याने शांतपणे आणि सहजतेने हे घृणास्पद आणि भयानक कृत्य केले. काही लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. रस्त्याने जाणाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की आरोपी स्वतः पोलिस ठाण्याकडे जात आहे. पोलिसांनी त्याला तिथे ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.
रोहित शर्माच्या विकेटनंतर सेलिब्रेशन का केलं नाही? मोहम्मद सिराजचं उत्तर वाचून वाटेन अभिमान!
पोलिसांनी कापलेले डोके आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात बिमल आणि त्याच्या मेव्हणीमधील दीर्घकाळापासूनच्या कौटुंबिक तणावाची बाब समोर आली आहे. तपासात पोलिसांना हत्येपूर्वी घरात भांडण झाल्याचे कळले, त्यानंतर आरोपीने हे भयानक आणि घृणास्पद कृत्य केले.
दरम्यान, पोलिसांचा असा विश्वास आहे की आरोपी मानसिकदृष्ट्या असंतुलित असू शकतो. त्यामुळे पोलीस आरोपीची मानसिक तपासणी करत आहेत. अटक केल्यानंतर आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि आरोपीच्या मानसिक आरोग्य अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.