उरणमध्ये 20 वर्षाच्या यशश्री शिंदेची दाऊद शेख याने कर्नाटकातून येवून हत्या केली. या हत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र त्याने हा पाऊल का टाकले? त्याने तिची हत्या का केली? हत्या करण्या पूर्वी त्याने काय केले? हत्येनंतर तो कसा पळाला? त्याला कोणी मदत केली? उरणला येताना त्याच्या डोक्यात काय होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू बाहेर येत आहेत. दाऊदला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यात त्याची पोलिस कसून चौकशी करत आहेत. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दाऊद शेख हा सतत यशश्रीच्या संपर्कात होता. त्यामुळेत तो तिला भेटण्यासाठी कर्नाटकातून उरणला निघाला. ती तारीख होती 22 जुलै. त्या दिवशी तो निघाला दुसऱ्या दिवशी 23 जुलैला तो उरण ला पोहोचला. त्यानंतर त्याने यशश्रीला फोन केला. आपल्याला भेटायचं आहे असं त्याने तिला सांगितले. त्याच्या आग्रहाखातर ती त्याला 24 तारखेला जुईनगर रेल्वे स्टेशनमध्ये भेटली. या भेटीत त्याने तिला आपल्याबरोबर तू बंगळूरूला चल असा आग्रह धरला. पण ती त्यासाठी तयार झाली नाही. दुसऱ्या दिवशीही तू मला भेट असा तो तिला म्हणाला. पण त्यासाठीही ती तयार नव्हती. भेटण्याचे तिने नाकारले होते.
याचा राग दाऊदला आला. त्याने त्याच्याकडे असलेले तिच्या बरोबरचे काही फोटो फेसबूकवर अपलोड केले. अजून काही फोटो अपलोड करेने अशी धमकी ही त्याने दिली. तो दिवस 25 जुलैचाच होता. दाऊद ब्लॅकमील करत असल्यामुळे ती घाबरली. फोटो डिलट कर असं तिने त्याला सांगितले. त्यानंतर त्याला भेटण्याचे तिने मान्य केले. ज्या वेळी ती भेटायला गेली त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. दाऊद तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. शिवाय आपल्या बरोबर बंगळूरूला चल असे त्याचे म्हणणे होते. पण ती सतत नकार देत होती. याचा राग त्याला आला.
ट्रेंडिंग बातमी - यशश्री हत्याकांड : आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी
ती ऐकत नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या बरोबर बंगळूरू वरूनच हत्यार आणले होते. 25 तारखेलाही ते त्याच्या बरोबर होते. ही आली नाही तर तिची हत्या करायची हे त्याने आधीच ठरवले होते. त्यानुसार तिचा सततचा नकार ऐकून शेवटी त्याने तिची हत्या केली. हत्याकरून तिचा मृतदेह झाडीत फेकला. त्यानंतर काही झाले नाही असा अविर्भावात तो लोकलने पनवेलला पोहोचला. तिथे गेल्यावर कर्नाटकातल्या एका मित्राकडून एक हजार रूपये मागवून घेतले. ते पैसे त्याने पनवेलला एटीएममधून काढले. पैसे घेवून तो कळंबोलीला पोहचला. हायवेवरून त्याने बंगळूरूला जाणारी बस पकडली. त्यानंतर थेट त्याने आपले गाव गाठले.
टेंडिंग बातमी - यशश्रीनंतर आणखी एकीचा बळी; विरोध केला म्हणून 14 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं
दाऊद हा तिच्या सतत संपर्कात होता. त्याच्या फोन डिटेल्स वरून ते स्पष्ट झाले आहे. यशश्री ही अल्पवयीन असताना त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासाठी त्याला जेलमध्येही जावे लागले होते. त्यानंतर कोविड काळात त्याला जामीन मिळाला. त्यानंतर तो कर्नाटकात गेला. पण तो यशश्रीच्या तेव्हाही मागावर होता. शेवटी प्लॅन करून तिने तिला संपवले.