Bangladesh Hindu Crime : बांग्लादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात अल्पसंख्यांक हिंदू समुदायाचे प्रमुख नेता भबेश चंद्र रॉय (58) यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदुवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. भारताने या हत्येवर संताप व्यक्त करीत बांग्लादेशाच्या अंतरिम सरकारकडून अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेची हमी मागितली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भबेश चंद्र रॉय हे दिनाजपुरच्या बसुदेवपूर गावातील निवासी होती. ते बांग्लादेश पूजा-उत्सव परिषदेच्या बिराट युनिटचे उपाध्यक्ष होते. ते स्थानिक हिंदू समुदायामध्ये प्रभावी नेता म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पत्नी शांतना रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 17 एप्रिल रोजी दुपारी साधारण 4.30 वाजता भबेश यांना एक फोन आला. ज्यातून हल्लेखोरांनी ते कुठे उपस्थित आहेत, याची खात्री करून घेतली होती. अर्ध्या तासानंतर चार लोक दोन मोटरसायकलवरुन त्यांच्या घरी आले आणि त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले.
नक्की वाचा - 'आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे, कलमाच्या आधारावर बनला पाकिस्तान', पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाच्या ओठावर आलं सत्य
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भबेश यांना नराबारी गावात नेण्यात आलं. येथे त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांनी बेशुद्धावस्थेत त्यांना एका गाडीत टाकून घरी सोडलं. कुटुंबीयांनी तातडीने बिराल उपजिल्हा आरोग्य केंद्रात त्यांना घेऊन जाण्यात आलं. यानंतर दिनाजपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. शांतनाने दावा केला आहे की, ती दोन हल्लेखोरांना ओळखते.
बिराल पोलीस स्टेशनचे प्रमुख अब्दुस साबुर यांनी सांगितलं की, प्रकरण दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि संशयितांचा शोध घेतला जात आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रवक्ता रणधीर जायस्वाल यांनी याला हिंदू अल्पसंख्यांवरील नियोजित अत्याचाराचा भाग असल्याचं सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या घटनेचा संताप व्यक्त करीत भारत सरकारकडून तत्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.