Basavaraju : अभियांत्रिकीची पदवी, युद्धातही तज्ज्ञ; दीड कोटींचं बक्षीस असलेला अत्यंत धोकादायक नक्षलवादी ठार

Who is Naxalite Basavaraju: छत्तीसगडच्या नारायणपुरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यामध्ये बसवराजूचा खात्मा करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्तीसगडच्या नारायणपुरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. अद्यापही सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे डीआरजीच्या सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या कमांडरला घेरलं आहे, ज्यामध्ये नक्षलवादी संघटनेचा महासचिव नंवबल्ला केशव राव उर्फ बसवराजू ठार झाला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

नंवबल्ला केशव राव उर्फ बसवराजू कोण आहे?

नंबबल्ला केशव राव उर्फ बसवराजू याचं वय साधारण 70 वर्षे. तो श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियन्नापेटा गावात राहत होता. बसवराजू नोव्हेंबर 2018 मध्ये सीपीआय माओवादी संघटनेचा महासचिव आणि गेल्या 35 वर्षांपासून माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. 

बसवराजू एके 47 रायफल सोबत ठेवत होता.  छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील काही भागात सक्रीय होता. बसवराजूवर तब्बल दीड कोटींचं बक्षीस होतं. बसवराजू हे 24 वर्षांपासून पॉलिटब्युरो सदस्य म्हणून सक्रिय होता. त्याने पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचा प्रभारी म्हणूनही काम केलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Naxalite : DRG जवानांची मोठी कारवाई, 1 कोटींच बक्षीस असलेल्या बसव राजूसह 26 नक्षलवादी ठार

बसवराजूने वारंगलमधून केलंय इंजिनियरिंगचं शिक्षण

बसवराजूने स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेकचं शिक्षण घेतलं होतं. त्याला नवबल्ला केशव राव गंगण्णा, विजय, दर्पू नरसिंह रेड्डी, नरसिंह, प्रकाश, कृष्णा या नावांनींही ओळखलं जात होतं. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने 1970 मध्ये घर सोडलं होतं. त्यानंतर तो नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीयपणे काम करू लागला होता.

गणपतीनंतर बसवराजूला 2018 मध्ये संघटनेच्या सहसचिवाची जबाबदारी देण्यात आली होती. अधिकतर वेळी तो सैन्याची जबाबदारी सांभाळत होता. बसवराजू सैन्याची जबाबदारी घेणं आणि आक्रमक हल्ल्यांसाठी ओळखला जात होता. हल्ल्यांची रणनीती तयार करण्यातही बसवराजू हुशार होता. बसवराजूला युद्धशास्त्रात तज्ज्ञ होता. 

Advertisement