मुंबईच्या आईस्क्रीममध्ये कसं आलं माणसाचं तुटलेलं बोट? गाझियाबादशी आहे कनेक्शन

Human Finger in Ice Creme: खाण्यात माशी, पाल, झुरळ हे सापडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आईस्क्रीममध्ये माणसाचं तुटलेलं बोट सापडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडलाय.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

Human Finger in Ice Creme: खाण्यात माशी, पाल, झुरळ हे सापडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आईस्क्रीममध्ये माणसाचं तुटलेलं बोट सापडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडलाय. मुंबईतल्या मालाडमधील एका डॉक्टरनं बुधवारी ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. त्यामध्ये त्याला आईस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा सापडला. मालाड पोलिसांनी हे बोट फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 'यम्मो' या आईस्क्रीम कंपनीसह त्यांच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे बोट आईस्क्रीममध्ये कसं आलं याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आईस्क्रीम बदललं आणि बोट आलं

मुंबईतील ज्या डॉक्टरांनी हे आईस्क्रीम मागवलं होतं, त्यांचं नाव ब्रँडन फेराओ आहे. 26 वर्षांच्या ब्रँडननं पोलिसांना सांगितलं की त्यांनी एका ऑनलाईन अ‍ॅपवरुन यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती. बुधवारी सकाळी साधारण 10 वाजून 10 मिनिटांनी ही ऑर्डर घरी आली. पण डिलिव्हरी मॅननं तीन मँगो आईस्क्रीमच्या जागी दोन मँगो आणि एक बटरस्कॉच आईस्क्रीम आणलं. दुपारी जेवणानंतर फेराओ यांनी बटरस्कॉच आईस्क्रीमचा कोन खाण्यासाठी उघडला. त्यावेळी त्याला खाताना काही तरी विचित्र जाणवलं. त्यानं तातडीनं ते आईस्क्रीम थुंकलं. त्यावेळी त्यामध्ये माणसाचं बोट असल्याचं त्याला दिसलं. या बोटावर नख देखील होतं. 

( नक्की वाचा : ऑनलाइन जेवण मागवताय, थांबा! त्याआधी ही बातमी वाचा... )
 

तब्येतीवर परिणाम

फेरोओ यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार त्याच्या तोंडात माणसाचं बोट होतं, हा विचार करुन त्याला विचित्र वाटतंय. मला मळमळत असून मी ते कधीही विसरु शकत नाही. त्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून यम्मो आईस्क्रीमच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर एका कस्टमर केअर ऑफिसरनं त्यांना फोन केला. फेराओ यांनी माणसाचं बोट आढळल्यानंतर त्यांनी ऑर्डरचा तपशील आणि आईस्क्रीमच्या पॅकचा फोटो पाठवण्यास सांगितलं. फेराओनी त्यानुसार सर्व माहिती कस्टमर केअरला पाठवली. त्यानंतर 10-12 मिनिटांनी कंपनीच्या ग्राहक सेवा विभागातून त्यांना पुन्हा फोन आला. ते या मुद्याचा तपास करत आहेत, असं त्यांनी कळवलं. पण, त्यांना कोणतंही अपडेट मिळालं नाही.

गाझियाबाद कनेक्शन

फोराओ यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, 'मी तोंडातून काढून ते बोट बर्फात सुरक्षित ठेवलं. त्यानंतर आईस्क्रीम रॅपरसह मालाड पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्या रॅपरवर मॅन्यूफॅक्चरिंग डेट 11 मे 2024 आणि एक्स्पायरी डेट 10 मे 2025 लिहिली होती. हे आईस्क्रीम गाझियाबादमधील लक्ष्मी आईस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या कंपनीकडून बनवण्यात आलं. 

Advertisement

यम्मो कंपनीच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही त्या कंपनीकडून मिळणारी सर्व्हिस बंद केली आहे. त्यांच्याकडून आलेल्या प्रॉडक्टसना गोदामात वेगळं ठेवलंय. बाजारामध्येही तसंच करण्याची प्रक्रिया सुरु केलीय. आम्ही या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत.'

( नक्की वाचा : वैद्यकीय अधिकारी गायब, कर्मचाऱ्यांना पत्ताच नाही; मृतदेह आढळल्याने खळबळ )
 

आईस्क्रीममध्ये कसं आलं बोटं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॅकेजिंगच्या दरम्यान ते बोट आईस्क्रीममध्ये आल्याची शक्यता आहे. पोलिसांनी यम्मो कंपनीच्या विरोधात आयपीसी कलम 272 (खाद्यपदार्थ विक्रीमध्ये भेसळ), 273 (हानिकारक भोजनाची विक्री) आणि 336 ( दुसऱ्यांचा जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ते बोट फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवलं आहे. ज्या कारखान्यात हे आईस्क्रीम पॅक झालं त्याचीही चौकशी करण्याची पोलिसांची योजना आहे. त्यानंतरच ते बोट आईस्क्रीममध्ये कसं आलं? हे समजू शकेल. पोलिसांनी त्या कारखान्यालाही टाळं ठोकलं आहे. 

Advertisement