भारतामध्ये रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळ घटनांसाठीच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. कनिष्ठ न्यायलयापासून राष्ट्रपतींपर्यंत आरोपीला फाशीच्या शिक्षेतून सूट मिळवण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. निर्भया प्रकरणातील 4 आरोपींना, मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब यांना फासावर लटकावण्यात आल्याचे भारतातील प्रत्येकाला ठावूक आहे. फासावर लटकावण्याची प्रक्रिया ही सर्वसामान्यांना वाटते तशी सोपी नसते. त्यासाठी काही महिने आधी तयारी केली जाते.
( नक्की वाचा: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी! )
कैद्याला अजिबात त्रास होऊ दिला जात नाही
ज्या कैद्याला फाशी होणार हे निश्चित झालेले असते, त्याला फाशीपूर्वी वेगळ्या बराकीत आणून ठेवले जाते. तिथे त्याला इतर कैद्यांपेक्षा चांगल्या सुविधा मिळत असतात. कैद्याचे वजन केले जाते आणि त्याच्या वजनाची पोती तयार करून त्यांच्या मदतीने फाशीची रंगीत तालीम घेतली जाते. ही रंगीत तालीम एकापेक्षा जास्तवेळा घेतली जाते. फासावर लटकावले जात असताना कैद्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी सगळी काळजी घेतली जाते.
जल्लादाची भूमिका महत्त्वाची
चित्रपटांमध्ये जल्लाद जसा क्रूर दाखवला जातो, तसा प्रत्यक्षात तो अजिबात नसतो. फाशी देण्याच्या प्रक्रियेत जल्लादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. फासावर लटकावत असताना एका झटक्यात कैदी मरणं गरजेचं असतं. त्यासाठी दोर कसा ओढायचा, किती जोराने ओढायचा याचे सगळे टेक्निक जल्लादाला माहिती असणे गरजेचे असते. फासावर लटकावता क्षणी कैद्याच्या मानेकडील एक विशिष्ट भाग तुटतो आणि कैदी काही कळायच्या आतच जीव सोडतो. मरताना कैद्याला कोणतीही वेदना न होता मरण देणं याची जबाबदारी जल्लादाकडे असते.
( नक्की वाचा: आता ती भारतात कधीच परतणार नाही, दुबईत त्या लेकीसोबत काय झालं? )
दोराला लोणी का लावतात ?
फाशीचा दोर 203 आठवडे लोण्यात बुडवून ठेवला जातो. फासावर जाणाऱ्या कैद्याला दोराचा फास गळ्याला काचू नये, टोचू नये यासाठी ही काळजी घेतली जात असते. जल्लादाचे काम हे कैद्याला अलगद फाशी देण्याचे असते. गळ्याभोवतीचा फास असा बांधला जातो की मानेचा एक भाग झटकन तुटतो आणि माणूस तत्काळ मरतो. तडफडून मृत्यू होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. हे ज्याला परफेक्ट माहिती असते तोच जल्लाद बनतो.
( नक्की वाचा: 40 वर्षांनी पुन्हा ताजं झालेलं रंगा-बिल्ला प्रकरण काय आहे? त्यानंतर दिल्ली कशी बदलली? )