जाहिरात

Sad Ending: आता ती भारतात कधीच परतणार नाही, दुबईत त्या लेकीसोबत काय झालं?

शहजादीला दुबईत फसवून नेण्यात आलं होतं. लहान पणी तिचा चेहरा जळाला होता. तो दुबईत गेल्यावर उपचारानंतर बरा होईल. शिवाय तिथे चांगला पगार मिळेल असं तिला सांगण्यात आलं होतं.

Sad Ending: आता ती भारतात कधीच परतणार नाही, दुबईत त्या लेकीसोबत काय झालं?

उत्तर प्रदेशात राहाणारी शहजादी हीला फसवणूक करुन दुबईला पाठवण्यात आलं होतं. पण तिथं ती एका षडयंत्राला बळी पडली, असा आरोप तिचे आई वडील करत आहेत. तिचे आई वडील भारतात असतात. तर लेकीला दुबईत फाशीची शिक्षा झाली होती. तिच्या बरोबर त्यांचं शेवटचं फोनवर बोलणंही झालं होतं. त्यावेळी सर्व काही ठिक होईल, तुझी  शिक्षा टळेल असा दिलासा तिच्या आई वडीलांनी तिला दिला होता. देवावर विश्वास ठेव असं सांगत तिली धिर दिला होता. आपली लेक परत घरी येईल यावर त्यांचा विश्वास होता. पण त्यांचा हा विश्वास आता तुटला आहे. ती आता कधीच परत घरी येणार नाही. कारण तिला दुबईत फासावर लटकवण्यात आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शहजादीला 15 फेब्रुवारी रोजी दुबईत फाशी देण्यात आली. केंद्र सरकारने याबाबतची माहिती दिल्ली उच्च न्यायालयाला दिली आहे. तिच्यावर अंतिम संस्कार हे मार्च महिन्यात केले जातील. हे अंतिम संस्कार पाच मार्चला होतील असं सांगण्यात आलं आहे. दुबईत लेकीला फाशीची शिक्षा झाली होती. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रायलने हस्तक्षेप करावा अशी याचिका भारतात  असलेल्या तिच्या आई-बाबांनी केली होती. मात्र संयुक्त अरब अमीरातच्या सरकारने भारतीय दुतावासाला 28 फेब्रुवारीलाच शहजादीला फाशी दिल्याचे कळवले होते.    

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

शहजादी ही मुळची उत्तर प्रदेशातल्या बांदा इथं राहाणारी होती. फसवणूक करून तीला दुबईला पाठवण्यात आलं होतं. पण तिथे ती एका षडयंत्राची शिकार झाली, असा आरोप तिच्या पालकांनी केला होता. तिचे आई वडील उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावात राहातात. या शहजादीला दुबईमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याआधी शेवटची इच्छा म्हणून तिने आपल्या आई वडीलांना शेवटचा फोन कॉल दुबईतल्या जेलमधून केला होता. त्यावेळी दोन मिनिट लेकीनं  आई बापा बरोबर बोलणं केलं.  ही शहजादी त्यावेळी अबूधाबीच्या जेलमध्ये होती. 

ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...

त्यावेळी तिने शेवटचा फोन आपल्या आई वडीलांना केला होता. तुम्ही काळजी करू नका. जे नशिबात आहे ते होणार. तुम्ही केस लढत राहाल पण त्याने काही होणार नाही. हा माझा शेवटचा फोन आहे. यानंतर मी या जगात नसेल. लेकीच्या या बोलण्यावरून तिचे वडील ढसाढसा रडले. मुली तुझ्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही. देवावर विश्वास ठेव काही तरी चमत्कार नक्की होईल असा विश्वास तिचे वडील तिला देत होते. पण आता काही होणार नाही. शहजादीला फासावर लटकवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची लेक त्यांना आता परत कधीही भेटणार नाही.  

ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde: फडणवीस- शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न? SIT चौकशीत धक्कादायक माहिती, टेन्शन कुणाचे वाढणार?

शहजादीला एक आग्र्याच्या एजंटने दुबईत एका जोडप्याला विकलं होतं. त्यानंतर ती दुबईत त्या जोडप्याच्या घरी काम करत होती. त्यावेळी त्या घरात चार महिन्याचा लहान मुलगा होता. त्याला त्याच्या आईने नियमित डोस दिला होता. मात्र त्यानंतर त्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. त्यामुलाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. तसेच त्याला दफनही करण्यात आले. अशा स्थितीत शहजादीवर त्या मुलाच्या हत्येचा आरोप करण्यात आला असं तिचे कुटुंबीय सांगतात. त्याच वेळी तिच्याकडील मोबाईलही काढून घेण्यात आला. शिवाय तिला जबरदस्तीने आरोप कबुल करायला लावला असा आरोपही तिच्या आई वडीलांनी केलाय. 

ट्रेंडिंग बातमी - Road accident: गेल्या 5 वर्षात रस्ते अपघातात किती बळी? आकडा विचार करायला भाग पाडेल

शहजादीला दुबईत फसवून नेण्यात आलं होतं. लहान पणी तिचा चेहरा जळाला होता. तो दुबईत गेल्यावर उपचारानंतर बरा होईल. शिवाय तिथे चांगला पगार मिळेल असं तिला सांगण्यात आलं होतं. या आमिषामुळे ती दुबईला जाण्यास तयार झाली होती. पण तिच्या बरोबर भलतचं घडलं. गेल्या दोन वर्षापासून ती जेलमध्ये होती. आता तिला फाशी देण्यात आली आहे. तिने शेवटची इच्छा म्हणून आपल्या आई वडीलांना फोन केला होता. ते ही गरिब असल्याने मुलीला मदत करण्यासाठी त्यांनाही मर्यादा पडत होत्या. अखेर आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे.