दाऊद इब्राहिमला घरात घुसून मारण्याचा अजित डोवाल यांचा प्लॅन कुणामुळे फसला? वाचा Inside Story

अजित डोवाल एका महत्त्वाच्या ऑपरेशनची रणनीती आखत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात का घेतलं होतं? वाचा इनसाईड स्टोरी.

जाहिरात
Read Time: 4 mins
When Mumbai Police Nabbed Ajit Doval

Mumbai Police And Ajit Dowal History : पुण्यात गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'लोकमान्य टिळक पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं.देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी डोवाल यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशाच्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी डोवाल यांनी अनेक ऑपरेशन्स चालवले.यापैकी बहुतांश ऑपरेशनमध्ये त्यांना यश मिळालं.परंतु,अशाच एका महत्त्वाच्या ऑपरेशनची रणनीती आखत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालक पदावरून नुकतंच निवृत्त झालेल्या अजित डोवाल यांच्यासोबत त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?  याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

11 जुलै 2005 रोजी दिल्लीतील बाराखंभा रोडवरील एका हॉटेलमध्ये जी बैठक झाली, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. डोवाल याचदिवशी हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी दोन व्यक्तींसोबत चर्चा करत होते. तेव्हा साध्या वेशात आलेल्या मुंबई पोलिसांच्या जवळपास सहा अधिकारांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला आणि डोवाल यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतलं.  

Advertisement

अजित डोवाल यांच्यासाठी 'तो' मोठा धक्का होता

या कारवाई दरम्यान डोवाल आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली होती.त्यानंतर डोवाल यांनी मुंबई पोलीस तत्कालीन सहआयुक्त मीरा बोरवणकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि स्वत:ची ओळख पटवून दिली.त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडलं. मात्र,त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.डोवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का होता,कारण मुंबई पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांचे एक ऑपरेशन सुरू होण्यापूर्वीच संपले. ते छोटं-मोठं ऑपरेशन नव्हतं,तर अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमला कराचीतील त्याच्या घरात घुसून ठार मारण्याचा हा प्लॅन होता.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'या' सोसायटीतील नागरिक भयभीत, एकाच रात्री 5 फ्लॅटमध्ये झाल्या घरफोड्या, लाखोंचा माल लंपास

​"शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो" ही हिंदीतील म्हण गुप्तहेर क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी रणनीती मानली जाते. दाऊद हा भारताचा शत्रू आहे आणि छोटा राजन' दाऊदचा शत्रू 'आहे.तोच छोटा राजन,ज्याने जवळपास दोन दशकं दाऊदसाठी त्याचा उजवा हात म्हणून काम केलं. पण 1994 नंतर तो त्याचा कट्टर शत्रू बनला. अशा वेळी भारतीय गुप्तचर यंत्रणांसाठी दाऊदचा खात्मा करण्यासाठी छोटा राजनपेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकत होता?दाऊदला संपवण्यासाठी भारतीय यंत्रणांनी छोटा राजनच्या टोळीशी हातमिळवणी केली होती,कारण दोघांचे लक्ष्य एकच होते.

फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा अशी त्या व्यक्तींची नावे आहेत, ज्यांच्यासोबत डोवाल यांनी दिल्लीतील बाराखंभा रोडवरील एका हॉटेलमध्ये चर्चा केली होती.तनाशा आणि मल्होत्रा हे छोटा राजनचे जुने साथीदार होते आणि दाऊदच्या टोळीबद्दल त्यांना खूप चांगली माहिती होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या छोटा राजनच्या संमतीने हे दोघे अजित डोवाल यांना भेटायला आले होते.दाऊदची मुलगी माहरूखचा विवाह पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादचा मुलगा जुनेद याच्यासोबत 23 जुलै 2005 रोजी कराचीमध्ये होणार होता.या लग्नाच्या समारंभातच तनाशा आणि मल्होत्रा यांच्या मदतीने दाऊदचा गेम करण्याची योजना डोवाल आखत होते.परंतु मुंबई पोलिसांच्या एन्ट्रीने या संपूर्ण योजनेवर पाणी फेरले.

नक्की वाचा >> DMart: डी-मार्टमध्ये इतर स्टोरअर्सच्या तुलनेत मॅगी स्वस्त का मिळते? हे सिक्रेट 99% लोकांना माहितच नाही

मुंबई क्राइम ब्रँचने तनाशा आणि मल्होत्रा यांचे फोन टॅप केले आणि..

खरंतर विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा हे मोठे गुन्हेगार होते. मुंबईत खंडणी वसूल करणे,हत्या आणि हत्येचा प्रयत्न करणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते.विशेष म्हणजे दिल्लीतील बैठकीच्या काही दिवसांपूर्वी ते कोलकाता आणि दिल्लीच्या नंबरवरून मुंबईतील एका मोठ्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावत होते.त्या बिल्डरच्या तक्रारीवरून मुंबई क्राइम ब्रँचने तनाशा आणि मल्होत्रा यांचे फोन टॅप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते दिल्लीत कोणालातरी भेटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

Advertisement

याच माहितीच्या आधारे मुंबई क्राइम ब्रँचचे डीसीपी धनंजय कमलाकर आणि पोलीस निरीक्षक दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी दोघांना अटक केली.अजित डोवालही त्यांच्यासोबत असल्याने पोलिसांचा त्यांच्याविषयी गैरसमज झाला आणि  त्यांनाही गुंड समजून ताब्यात घेतलं होतं. तनाशा आणि मल्होत्रा यांच्यावर 'मकोका'कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र काही वर्षांनंतर ते जामिनावर बाहेर आले.2010 मध्ये मुंबईतील चेंबूर भागात तनाशाची हत्या झाली,तर मल्होत्रा रहस्यमयरीत्या गायब झाला.दोन यंत्रणांमध्ये (केन्द्रीय गुप्तचर संस्था आणि राज्य पोलीस) ऐनवेळी परस्पर समन्वयाचा अभाव असल्यामुळे दाऊदला संपवण्याचे हे मिशन कसं यशस्वी झाले नाही,याचे हे एक मोठे उदाहरण ठरले.