Video : महिलेनं घटस्फोटाच्या वेळी मागितली महिना 6 लाखांची पोटगी! न्यायाधीश म्हणाल्या, 'स्वत: कमव'

Divorce Case : महिलेनं घटस्फोटाच्या खटल्यामध्ये दर महिना पोटगी म्हणून मागितलेली रक्कम ऐकल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या महिला न्यायाधीश देखील थक्क झाल्या. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कोणत्याही जोडप्याला त्यांचा संसार काही कारणामुळे पुढं नेणं शक्य नाही हे जाणवल्यानंतर ते घटस्फोटाचा निर्णय घेतात. घटस्फोटाच्या वेळी पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसेल तर तिला महिना पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पत्नीनं मागितलेली पोटगीची रक्कम अंतिम करण्याचा अधिकार कोर्टाला आहे. कर्नाटक हायकोर्टात पोटगीचं एक अजब प्रकरण पोहचले. त्यामध्ये महिलेनं दर महिना पोटगी म्हणून मागितलेली रक्कम ऐकल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या महिला न्यायाधीश देखील थक्क झाल्या. 

दर महिना 6 लाख 16 हजार 316 रुपयांची मागणी

या महिलेनं पोटगीमध्ये दर महिना 6 लाख  6 लाख 16 हजार 316 रुपयांची मागणी केली. महिलेच्या वकिलानं ही रक्कम सांगताच न्यायाधिशांना देखील धक्का बसला. एकटी महिला इतका खर्च करु शकत नाही, असं मत त्यांनी सांगितलं. त्यावर महिलेला ब्रँडेड कपडे घालण्याचा छंद आहे, असं तिच्या वकिलानं सांगितलं. त्यावर न्यायाधिशांनी हा छंद असेल तर महिलेनं स्वत: त्यासाठी कमाई केली पाहिजे असं सांगितलं. त्याचबरोबर खर्चाचा आकडा योग्य पद्धतीनं घेऊन या असा सल्लाही दिला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

( नक्की वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )

या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेच्या वकिलानं दर महिना 6 लाखांपेक्षा जास्त पोटगी मागताच न्यायाधिशांनी त्यांना तुम्ही नियमांचा गैरफायदा घेत आहात का? असा प्रश्न विचारला. नवऱ्याची बाजू मांडणाऱ्या वकिलानं देखील या रकमेचा विरोध करत ही छळवणूक असल्याचा युक्तिवाद केला.  

पत्नीच्या वकिलानं महिलेला गुडघादुखीसह अन्य आजार असल्याचं सांगितलं. त्याच्या फिजोथेरपीचा खर्च दर महिना 4-5 लाख रुपये आहे. त्याचबरोबर महिलेच्या अन्य गरजांसाठी लागणाऱ्या पैशांचा हिशेब दिला.

Advertisement

पत्नीच्या वकिलानं सादर केलेल्या हिशेबानुसार महिलेचा दरमहा खर्च

फिजोथेरेपी - 4 ते 5 लाख रुपये
बूट आणि कपडे - 15000 रुपये
घरातील जेवण - 60000 रुपये
बाहेर खाण्यासाठी काही हजार रुपये
एकूण पोटगीची रक्कम -  6,16,300 रुपये 
 

Advertisement