पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का, दुसऱ्याच दिवशी नवऱ्यानेही संपवलं आयुष्य

मणिकर्णिका कुमारी (वय २८ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. तर योगेश कुमार अस ३६ वर्षीय पतीचं नाव आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

पत्नीचं अपघाती निधन झाल्यानंतर काही तासातच पतीने देखील आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोई येथील ही घटना आहे. मणिकर्णिका कुमारी (वय २८ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. तर योगेश कुमार अस ३६ वर्षीय पतीचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश शिक्षक तर मणिकर्णिका नर्स म्हणून नोकरी करत होती. सहा महिन्यांपूर्वीच योगेश आणि मणिकर्णिका यांचं लग्न झालं होतं. 

नक्की वाचा-  बहिणीला लग्नात सोन्याची अंगठी देण्याची भावाची इच्छा अपूर्ण; रागावलेल्या पत्नीने जीवच घेतला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिकर्णिका आरोग्य केंद्रात निघाली होती त्यावेळी तिचा लखनौ-हरदोई महामार्गावर अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने तिच्या स्कूटरला जोरदार धडक दिली होती. या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. 

मणिकर्णिका हिच्या आयकार्ड आणि मोबाईल नंबरवरुन योगेशशी संपर्क साधण्यात आला आणि घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. योगेश तातडीने घटनास्थळी पोहोचला होता. पत्नीचा मृतदेह पाहून योगेश घरी परतला. 

(नक्की वाचा- फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, वाढदिवसापूर्वीच चिमुकल्याला मृत्यूने कवटाळलं)

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, शेजारी नातेवाईक योगेशचं सांत्वन करण्यासाठी घरी पोहोचले. घराचा दरवाजा बराच वेळ ठोठावला तरी काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडला त्यावेळी योगेश घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. योगेश आणि मणिकर्णिका यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article