पतीला हि*डा म्हणणे ही क्रूरताच आहे असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे. न्यायाधीश सुधीर सिंह आणि न्यायाधीश जसजित सिंग बेदी यांच्या खंडपीठासमोर घटस्फोटासंदर्भातील याचिका सुनावणीसाठी आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे उद्गार काढले आहेत. 12 जुलै रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने निवाडा करताना घटस्फोटाला मंजुरी दिली होती. पतीच्या आईने तिच्या सूनेवर आरोप करताना म्हटले होते की, तिची सून ही मुलाला हि*डा म्हणून बोलावते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा सर्वकष विचार करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य होता, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की नवऱ्याबाबत बायकोने जे उद्गार काढले आहेत, ते अयोग्य असून हा पतीचा मानसिक छळ आहे. पतीला हि*डा म्हणणे किंवा सासूला तू हि*डा जन्माला घातला आहे, असे म्हणून टोमणे मारणे ही क्रूरताच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
(नक्की वाचा: 2 वर्षांचा चिमुरडा माती खातो, मावस भावाने गळा आवळला; जागेवरच मृत्यू)
या जोडप्याचे 2017 साली लग्न झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर नवऱ्याने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. नवऱ्याने आरोप केला होता की त्याची बायको रात्री उशीरापर्यंत जागी असते. आपली आई आजारी असते तरीही तिला खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर बायको जेवण आणायला सांगते. नवऱ्याने याचिकेत म्हटले होते की, त्याच्या बायकोला पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते. हे व्हिडीओ पाहून बायको माझ्यावर सतत शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकायची. रोज रात्री किमान तीनवेळा शरीर संबंध ठेव आणि हे संबंध किमान 10-15 मिनिटे चालले पाहिजेत, असा बायकोचा आग्रह असतो असेही नवऱ्याने याचिकेत म्हटले होते.
नक्की वाचा : लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊन्टर करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस,करणी सेना पुन्हा चर्चेत
बायकोच्या शारीरिक इच्छा पूर्ण न केल्याने ती मला टोमणे मारते, असेही पतीने म्हटले होते. ज्या महिलेवर हे आरोप करण्यात आले होते, तिने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. नवऱ्याने आपल्याला घराबाहेर काढले होते आणि सासरची मंडळी मला गुंगीच्या गोळ्या द्यायचे, असा आरोप पत्नीने केला होता. बेशुद्ध झाल्यानंतर सासरची मंडळी मांत्रिकाचा ताईत गळ्यात बांधायचे, असाही आरोप महिलेने केला आहे. सासरची मंडळी मला वश करण्यासाठी काहीतरी मिसळलेले पाणी द्यायचे, असाही आरोप महिलेने केला होता.