जाहिरात

लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस,करणी सेना पुन्हा चर्चेत

5 डिसेंबर 2023 रोजी हल्लेखोर सुखदेव गोगामेडींच्या घरात घुसले होते आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला होता. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस,करणी सेना पुन्हा चर्चेत
नवी दिल्ली:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईची (Lawrence Bishnoi Gang) दहशत मुंबईमध्येही पसरू लागल्याचे दिसू लागले आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी बिश्नोईच्या सांगण्यावरून अभिनेता सलमान खान (Salman Khan Threat) याच्या इमारतीबाहेर गोळीबार करण्यात आला होता. बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे.

 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तुरुंगात बसून आपली गँग चालवणाऱ्या बिश्नोईला एन्काउंटरमध्ये ठार मारणाऱ्याला कोट्यवधींचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा वादात सापडलेल्या करणी सेनेच्या एका नेत्याने हे बक्षीस जाहीर केले आहे. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत (Raj Shekhawat Karni Sena) यांनी ही बिश्नोईला एन्काउंटरमध्ये ठार मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

व्हिडीओद्वारे आवाहन

शेखावत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये शेखावत यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे करणी सेना संतापली आहे. यामुळेच शेखावत यांनी बिश्नोईचा एन्काउंटर करा, असे पोलिसांना आवाहन केले आहे. गोगामेडी यांची हत्या बिश्नोई याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे. शेखावत यांनी 'X' वर एक पोस्ट लिहित क्षत्रिय करणी सेनेची ही मागणी केंद्र सरकारने तत्काळ पूर्ण करावी अशी मागणी केली आहे.

नक्की वाचा : प्रेमासाठी काहीही! 'क्राईम पेट्रोल'मधील पोलीस झाली आरोपी, अभिनेत्रीने असा आखला बनाव

घरात घुसून गोगामेडींची हत्या

गेल्या वर्षी गोगामेडी यांची त्यांच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. 5 डिसेंबर 2023 रोजी हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले होते आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला होता. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. बिश्नोई टोळीतील गुंड गोल्डी ब्रार याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ब्रारने म्हटले होते की गोगामेडी हे त्याच्या कामात अडथळा निर्माण करत होते. गोगामेडी यांना अडथळा निर्माण करू नका अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकीही देण्यात आली होती. मात्र गोगामेडी यांनी या धमक्यांना भीक घातली नव्हती. रोहीत राठोड आणि नितीन फौजी या दोघांना गोगामेडींच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com