Husband And Wife Family Dispute : ग्वालियर जिल्ह्यातील डबरा येथे एका महिलेनं वाद झाल्यानंतर पतीच्या शरीरावर गरम पाणी फेकलं. ज्यामुळे त्याच्या गुप्तांगाला आणि पायाला दुखापत झाली आहे.हा भयंकर प्रकार घडल्यानंतर महिला तिच्या माहेरच्या लोकांसोबत फरार झाली. तिने घरातील दागिने आणि रोख रक्कमही सोबत नेली.आरोपी महिलेनं तिच्या सासऱ्याच्या अंगावरही उकळतं पाणी फेकलं आणि त्याला जखमी केलं.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
नेमकं काय घडलं होतं?
याबाबत सविस्तर वृत्त असं की,आरोपी महिलेचं नाव केशकाली असून ती डबरा येथील पिछोर या ठिकाणची रहिवासी आहे. भुपेंद्र कुशवाह नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं.लग्नाच्या 14 वर्षानंतरही दोघांना अपत्य झालं नाही. पती भूपेंद्रला दारू पिण्याची सवय लागली होती. त्यामुळे घरात वादविवाद व्हायचे. 27 जून रोजी दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटली. त्यानंतर केशकालीने किचनमध्ये डाळ शिजवण्यासाठी ठेवलेलं गरम पाणी पती कुशवाहच्या अंगावर फेकलं. यामुळे त्याचं शरीर भाजलं. या घटनेबाब पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही जखमींना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
नक्की वाचा >> Palghar News: शिर्डीहून परतणाऱ्या साईभक्तांचं होत्याचं नव्हतं झालं! एका प्राण्यामुळे कुटुंबाचा घात झाला
रोजच्या जाचाला वैतागली होती महिला
आरोपींच्या माहितीनुसार, भुपेंद्र कुशवाह त्याची पत्नी केशकालीला मारहाण करायचा. पतीच्या रोजच्या त्रासाला पत्नी वैतागली होती.तसच पत्नीने पतीच्या या कृत्यांबाबत माहेरच्या लोकांनाही सांगितलं होतं. जेव्हा केशकालीच्या माहेरचे लोक घरी आले,तेव्हाही दोन्ही कुटुंबात वाद झाला.त्यावेळी महिलेनं पती आणि सासऱ्यावर गरमी पाणी फेकलं.
नक्की वाचा >> Video : 65 फूट खोल अमृतकुंडात आढळलं प्राचीन शिवलिंग, महाराष्ट्राच्या या ठिकाणी महादेवाच्या भक्तांची अलोट गर्दी
दरम्यान, केशकालीने जाणूनबुजून उकळतं पाणी अंगावर फेकलं आणि घारातील सोने-चांदीचे दागिने आणि पैसै घेऊन ती फरार झाली, असा आरोप तिचा पती कुशवाहने केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world