जाहिरात

Palghar News: शिर्डीहून परतणाऱ्या साईभक्तांचं होत्याचं नव्हतं झालं! एका प्राण्यामुळे कुटुंबाचा घात झाला

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन विरारकडे परतणाऱ्या विरार जीवदानी परिसरातील शोरंबाग सोसायटीत राहणाऱ्या साईभक्त कुटुंबावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला.

Palghar News: शिर्डीहून परतणाऱ्या साईभक्तांचं होत्याचं नव्हतं झालं! एका प्राण्यामुळे कुटुंबाचा घात झाला
Saibaba Devotees Car Accident News

Saibaba Devotees Accident News : शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन विरारकडे परतणाऱ्या विरार जीवदानी परिसरातील शोरंबाग सोसायटीत राहणाऱ्या साईभक्त कुटुंबावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला.विक्रमगड-मनोर मार्गावरील जांभा फरशी परिसरात रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात टोयोटा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून तब्बल 100 मीटर अंतरावरील झाडाझुडपांमध्ये घुसली आणि त्या कारचा भीषण अपघात झाला. 

जखमींना विक्रमगड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

या अपघातात श्रद्धा संतोष भानत (27) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.तर तिची आई अपर्णा संतोष भानत (47)आणि बहीण ऐश्वर्या संतोष भानत (26)गंभीर जखमी झाल्या आहेत.वाहनचालक प्रीतेश जाधव हे या अपघातातून सुखरूप बचावले.अपघाताची माहिती मिळताच विक्रमगड पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.जखमींना तत्काळ विक्रमगड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

नक्की वाचा >> Video : 65 फूट खोल अमृतकुंडात आढळलं प्राचीन शिवलिंग, महाराष्ट्राच्या या ठिकाणी महादेवाच्या भक्तांची अलोट गर्दी

वाहनावरील नियंत्रण सुटले अन् कार थेट झाडाझुडपांत आदळली

प्राथमिक माहितीनुसार,रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला धडक बसू नये म्हणून चालकाने वाहन वळवले असता त्यावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या झाडाझुडपांत जाऊन आदळली.शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या विरार जीवदानी येथील शोरंबाग सोसायटीतील या साईभक्त कुटुंबावर या भीषण अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास विक्रमगड पोलीस करीत आहेत.

नक्की वाचा >> KDMC मुख्यालयावर धडक मोर्चा, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com