बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटली अन्..., पेण तालुका हादरला!

महिला कर्मचाऱ्याला उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
पेण:

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये बंदूक साफ करत असताना पायाला गोळी लागल्याने नूतन लाड या महिला कर्मचारी जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - आणखी एका बस अपघाताने महाराष्ट्र हादरला! जालन्यात ST अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू, 20 जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक साफ (सर्व्हिसिंग) करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली. सदर गोळी ही नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना लगेच पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सदर घटना घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ जखमी महिला पोलीस कर्मचारीची भेट घेऊन चौकशी केली.

Topics mentioned in this article