लक्ष्मण सोलुंके, प्रतिनिधी
कुर्ल्यातील बेस्ट बसची घटना ताजी असताना जालन्यातूनही एक अपघाताची घटना समोर आली आहे. जालन्याजवळ एका बसला अपघात झाला आहे. आयशर ट्रक आणि बसची समोरा समोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 2 प्रवासी ठार झाले असून 20 जण जखमी झाले आहेत.
ही बस मालेगावहून जालना मार्गे माहूरगडला जात होती. मात्र जालन्यातील नाव्हा शिवारात आयशर ट्रक आणि बस यांची समोरा समोर धडक झाली आणि यात 2 जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात घडताच स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून बचाव कार्य सुरू केलं. त्यामुळे जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात आयशर आणि बसचा चक्काचूर झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world