लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न एका तरूणीने केला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजून कोणालाही या प्रकरणी अटक करण्यात आली नाही. तरूणीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने वार केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भिवंडीत ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका 26 वर्षीय तरूणीचे 31 वर्षीय तरूणी बरोबर प्रेम संबध होते. ही तरूणी भिवंडीतल्या पद्मानगर भागात राहाते. हा तरूण तिच्या घरी गेला होता. त्यावेळी तरूणीने त्याच्याकडे लग्नाची विचारणा केली. मात्र त्यावेळी त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे तरूणीला संताप अनावर झाला. तिने किचनमध्ये असलेला चाकू घेतला. चाकूने तिने थेट त्या तरूणाच्या गुप्तांगावर हल्ला केला. त्यात तो तरूण जखमी झाला.
हल्ला झाल्यानंतर हा तरूण तिच्या घरातून पळाला. त्याने हॉस्पिटल गाठले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर त्याने झालेल्या प्रकरणाची तक्रार पोलीसात केली आहे. मात्र अजून कोणालाही या प्रकरणी अटक करण्यात आली नाही. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या आधीही अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून हा तरूण आणि तरूणीमध्ये प्रेम संबध होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world