women In love with the father : असं म्हणतात प्रेम हे वय, नातं आणि समाजाच्या मर्यादा मानत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एक ४५ वर्षीय महिला आपल्या होणाऱ्या सुनेच्या वडिलांच्या (५० वर्षे) प्रेमात पडली. या प्रेमासाठी ती घरदार आणि पती-मुलांनाही सोडून निघून गेली. महिले बेपत्ता झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील बाडनगरमधून हा प्रकार समोर आला आहे.
महिलेच्या तपासादरम्यान हा सर्व प्रकार समोर आला. महिलेचं कृत्य पाहून पोलिसांसह गावकरीही शॉक झाले. महिलेने सांगितलं की, ती आपल्या मरनाने पती आणि दोन मुलांना सोडून प्रियकरासोबत राहत होती. तिचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या होणाऱ्या सुनेचे वडील आहेत. महिलेच्या मुलाचा साखरपुडा ठरला होता. मात्र त्यापूर्वीच महिला आणि होणाऱ्या सुनेचे वडील एकमेकांच्या जवळ आले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मुलांचं लग्न होण्यापूर्वीच दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा - Pune News: 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' या वाक्याला पुण्याचा ठेकेदार भुलला आणि भलताच अडकला
८ दिवसांपर्वी कुटुंबाने एफआयआर केला दाखल
पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावलं. त्यांनी पोलिसांना सांगितलं, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि एकत्र राहू इच्छितो. मात्र हे प्रकरण वैयक्तिक असल्या कारणाने पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. महिलेला तिच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
