जाहिरात

Pune News: 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' या वाक्याला पुण्याचा ठेकेदार भुलला आणि भलताच अडकला

Pune News: पुण्याच्या ठेकेदाराला सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळे आमिष दाखवून गंडा घालत त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली.

Pune News: 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' या वाक्याला पुण्याचा ठेकेदार भुलला आणि भलताच अडकला
"Pune News: पुण्यातील ठेकेदाराला सायबर गुन्हेगारांनी लुटला"
Canva

- राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Pune News: पुण्यामध्ये एका ठेकेदारने चित्रविचित्र ऑनलाइन जाहिरातीस प्रतिसाद दिला आणि नंतर पुढे जे काही घडलं, त्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसावी. ऑनलाइन जाहिरातील प्रतिसाद देणे या ठेकेदाराच्या चांगलंच अंगलट आलंय. पुण्यातला हा ठेकेदार प्रेग्नेंसी जॉबसारख्या नको त्या जाहिरातील भुलला आणि मग भलताच अडकला. 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' (Looking For A Man Who Can Make Me Pregnant) अशी ऑनलाइन जाहिरात पाहून संबंधित व्यक्तीला मोह आवरला नाही. त्याने या जाहिरातीस प्रतिसाद दिला आणि तो सायबर रॅकेटच्या एका अजब जाळ्यात अडकला. या प्रकारात त्याला थोडीथोडके नाही तर तब्बल 11 लाख रुपयांची रक्कम गमवावी लागलीय.  

पुण्यातील नेमके हे प्रकरण आहे तरी काय? | Pune Pregnancy Job Scam 

- 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' अशा आशयाच्या ऑनलाइन जाहिरातीस ठेकेदाराने प्रतिसाद दिल्यानंतर फसवणुकीच्या प्रकारास सुरुवात झाली.  
- सायबर गुन्हेगारांनी विविध स्वरुपातील पॅकेजचे आमिष ठेकेदाराला दाखवलं आणि पॅकेजची व्रिकी केली. 
- पॅकेजेसमध्ये नेमके कोणत्या-कोणत्या गोष्टींचा समावेश होता, हे स्पष्ट झालेले नाही. पण हा सर्व प्रकार सायबर रॅकेटचा भाग होता.
- ठेकेदाराला सुरुवातीला छोटी-छोटी रकम भरण्यास सांगण्यात आले आणि नंतर मोठ्या रक्कमेची मागणी केली गेली.
- वेगवेगळी आमिष दाखवून सायबर गुन्हेगारींनी ठेकेदाराकडून जवळपास 11 लाख रुपये उकळले.

ठेकेदाराची फसवणूक कशी झाली? | Pune Contractor Cheated Of Rs 11 Lakhs News| Pune Pregnancy Job Scam News In Marathi

- सायबर गुन्हेगारांनी ठेकेदाराला विविध शुल्क आणि प्रोसेसिंग चार्जेसच्या नावाखाली रकम भरण्यास भाग पाडले.
-  नोंदणी शुल्क, सदस्यत्व शुल्क, गुप्तता शुल्क आणि इतर अनेक प्रकारच्या खर्चांचा यामध्ये समावेश होता.
- शुल्क भरल्याशिवाय त्याचे काम पूर्ण होणार नाही, असेही त्याला सतत सांगितले जात होते.

Mumbai KEM Doctor Stabbed:  साताऱ्यानंतर आता मुंबईच्या सरकारी डॉक्टरसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात चाकूने केले सपासप वार; कारण...

(नक्की वाचा: Mumbai KEM Doctor Stabbed: साताऱ्यानंतर आता मुंबईच्या सरकारी डॉक्टरसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात चाकूने केले सपासप वार; कारण...)

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत घेतली धाव 

- आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेकेदाराने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
- पोलिसांनी या सायबर गुन्ह्याचा तपास सुरू केला असून या रॅकेटमधील आरोपींचा शोध घेतला जातोय.

Mumbai Crime News: डबलडेकर बस हायजॅक, सामान्यांना ओलिस ठेवणाऱ्या 'राज'चा एन्काउंटर, रक्तरंजित थराराने मुंबई हादरली

(नक्की वाचा: Mumbai Crime News: डबलडेकर बस हायजॅक, सामान्यांना ओलिस ठेवणाऱ्या 'राज'चा एन्काउंटर, रक्तरंजित थराराने मुंबई हादरली)

    अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाइन जाहिरातींना प्रतिसाद देणे टाळावे. कुठल्याही वैयक्तिक कामासाठी मोठी रक्कम ऑनलाइन भरायला सांगितल्यास सावध व्हावे आणि तातडीने पोलिसांना संपर्क साधावा.

    Listen to the latest songs, only on JioSaavn.com