संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Women Thives Caught In CCTV Camera : आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात भाविकांची गर्दी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. मंगळसूत्र व चैन चोरी करणाऱ्या महिलांची टोळीच पंढरपूरमध्ये दाखल झाले असून महिलांच्या गर्दीत घुसून मंगळसूत्र चोरी करण्याचे सत्र सुरू आहे. याच बाबत आज विठ्ठल मंदिर परिसरातील एका बांगड्याच्या दुकानात मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत उपस्थित महिलांनी मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलांना धरून मोठा चोप दिला. यानंतर संबंधित चोरी करणाऱ्या संशयित महिलेस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
महिला चोरट्याला पकडून बेदम चोप दिला
याबाबत अधिक माहिती अशी की ,पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. यामध्ये महिला भाविकांचे प्रमाण देखील मोठे आहे. याच महिला भाविकांच्या गर्दीमध्ये शिरूर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याची चैन सोन्याचे कानातले असे दागिने चोरण्याचे प्रमाण मोठे आहे. आजच पंढरपूरच्या व्हीआयपी गेट समोर एका बांगडीच्या दुकानात महिलांच्या गर्दीत घुसून मंगळसूत्र चोरण्याचा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली. त्यानंतर उपस्थित महिलांनी संबंधित महिला चोराला धरून बेदम चोप दिला आहे. यानंतर पोलिसांच्या ताब्यात महिला चोरास देण्यात आले.