Pune Crime : पुण्यात महिलेकडून अफूची शेती; पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड

पुणे शहराला ड्रग्सचा विळखा पडल्याच्या अनेक बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहे. या प्रकरणात आता चिंताजनक बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Drugs Crime : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. पोर्शे, स्वारगेटसारख्या घटनांमुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यभरातील तरुणवर्ग पुण्यात नोकरीसाठी येत असतो. पुण्यात ड्रग्सचं प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी पुण्यातील एफसी रोडवरील L3 हॉटेलमध्ये सुरु असलेल्या ड्रग्स आणि दारू पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. या पार्टीचं स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यात वाहनांची तोडफोड केली तर....; उपद्रवींना प्रशासनाचा जबरदस्त दणका!

पुण्यात अफू या अमली पदार्थाची शेती केली जात असल्याची माहिती आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपीकडून अफूची शेती केली जात होती. पोलिसांची थेट शेतात धाड टाकल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या कारवाईत पुणे पोलिसांकडून 66 अफूची झाडे जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील एका महिलेकडून अफूची शेती केली जात होती. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये मंगल दादोसा जवळकर या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफूच्या पिकाची लागवड करून महिला अफू या अमली पदार्थाची शेती आणि विक्री करीत होती. 

Advertisement

अफू कसा तयार करतात?
अफूच्या बोंडापासून काढलेला चीक वाळवून अफू तयार केला जातो. अफूचा वापर हेरॉईन, खसखस आणि वैद्यकीय उपचारांसाठी केला जातो. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article