संजय तिवारी, नागपूर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यभर विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची आज विदर्भातील यवतमाळ जिल्हातील वणी येथे सभा झाली. मात्र याआधी त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्याने त्या घटनेचे पडसाद त्यांच्या भाषणात उमटल्याचे पाहायला मिळाले.
उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने गेले आहेत. यावेळी हेलीपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे यावरुन जबरदस्त संतापल्याचे पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरुन त्यांनी संबंधित यंत्रणा महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
(नक्की वाचा: जनतेचे पैसे घरी घेऊन जायचे नसतात! श्रीकांत शिंदेंची मविआ नेत्यांवर सडकून टीका)
डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात सगळ्यांना समान न्याय हे आम्ही मानतोच.पण यंत्रणांना हाताशी धरुन लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमत गाजविणाऱ्या दिल्लीश्वरांनी मात्र त्या संविधानाचा सगळ्याच पातळ्यांवर अवमान करायचा ठरवलं आहे.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 11, 2024
आज उद्धवसाहेबांच्या सामानाची वणी येथे काही… pic.twitter.com/XyM53sKOsy
सभेत याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा 8-10 जण माझ्या स्वागतासाठी आले. म्हटलं काय करायचं आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे. मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा, कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
(नक्की वाचा- : "भाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार"; महादेव जानकरांचा हल्लाबोल)
मोदी-शाहांची बॅग तपासली का?
"मी यंत्रणेला सांगत आहे की मी अजिबात रागावलो नाही. तुम्ही तुमचे काम करताय, मी माझे काम करतोय. यानंतर मी त्याला म्हणालो मोदी आणि शाहांची बॅग तपासली का? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको? असा सवाल करत उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.
पोलिसांचा तो अधिकार- प्रकाश आंबेडकर
निवडणुकांच्या दरम्यान बॅगा तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहेत. त्याचा एवढा इश्यू करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
(Except for the headline, this story has not been edited by NDTV staff and is published from a press release)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world