Kalyan Crime News Today : कल्याण शहरातील बैल बाजार मच्छी मार्केट परिसरात फरदीन शेख या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.'आमच्याकडे काय बघतोस?'असा जाब विचारत किरकोळ कारणाने दोन तरुणांनी विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केली. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. दरम्यान, या परिसरात मारहाण करणाऱ्या कुटुंबाची दहशत असल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला आहे.आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरात राहणारा फरदीन शेख हा विद्यार्थी त्याच्या लहान बहिणींना शाळेत सोडून घरी परत येत असताना दोन तरुणांनी त्याची दुचाकी अडवली .'तू आमच्याकडे का बघत होता' असं विचारत या तरुणांनी फरदीनला मारहाण केली. त्यानंतर फरदीन घरी आला आणि त्याच्या एका मित्रासोबत मारहाण करणाऱ्या तरुणाच्या घरी गेला आणि त्यांना या मारहाणीबाबत जाब विचारला.त्यानंतर त्या तरुणांना राग आला आणि त्यांनी चाकूने फरदीनवर प्राण घातक हल्ला केला.
नक्की वाचा >> रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या लग्नात ना पंडित, ना फेरे..देशभरात होतेय लग्नाची चर्चा, काय आहे खास कारण?
आरोपींची परिसरात दहशत, यापूर्वीही घडली होती धक्कादायक घटना
त्याच्या दुसरा भाऊ काईदनेही त्याला मारहाण केली. क्षुल्लक वादातून हा प्रकार घडला असून मारहाण करणाऱ्यांपैकी एक तरुण अल्पवयीन आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणांची परिसरात दहशत असून ते वारंवार नागरिकांना त्रास देत असतात. यापूर्वीही किरकोळ कारणांवरून वाद घालण्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या घरात घुसून या तरुणांनी धिंगाणा केल्याची माहिती समोर आली आहे.