Pune News: पुण्यातील पानशेत धरणात सर्वात भयंकर घटना! लोकांची एकच गर्दी जमली, स्थानिकांमध्येही घबराट

पुण्यातील पानशेत धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.तन्मय संदीप शेठे असं मृत तरुणाचं नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Panshet Dam Water Drowning News
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Panshet Dam News Today : पुण्यातील पानशेत धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.तन्मय संदीप शेठे असं मृत तरुणाचं नाव आहे.या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तन्मय शेठे हा आपल्या 8 ते 10 मित्रांसह पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता.यावेळी तो धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला.मात्र,पोहत असताना अचानक तो खोल पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

40 ते 45 मिनिटांत तन्मयचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढला अन्..

घटनेची माहिती मिळताच वेल्हा पोलीस स्टेशनला याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर वेल्हा पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर शेवते यांनी तातडीने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर जवळपास 40 ते 45 मिनिटांत तन्मयचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

Advertisement

नक्की वाचा >> Meta News: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप युजर्सना मोजावे लागणार पैसे! मेटाने जाहीर केले प्लॅन

पाण्यात उतरताना सुरक्षिततेचे नियम पाळा

त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान,उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पानशेत परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अशा ठिकाणी पाण्यात उतरताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.वेल्हे पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.