'चल यार दारु पिते है', मित्राला केलेल्या मेसेजमुळे सापडला डोंबिवलीतील वृद्ध महिलेचा मारेकरी

Dombivli Crime : मित्राला दारु पिण्याचं निमंत्रण देण्याच्या मेसेजमुळे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात डोंबिवली पोलिसांना यश मिळालं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
आरोपीला मित्रासोबत दारु पार्टी करायची होती.
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

मित्राला दारु पिण्याचं निमंत्रण देण्याच्या मेसेजमुळे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात डोंबिवली पोलिसांना यश मिळालं आहे. डोंबिवलीत एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या महिलेची त्यांच्या इमारतीमध्येच राहणाऱ्या तरुणानं हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय. डोंबिवली पोलिसांनी त्याला अटक केलीय. यश विचारे असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास इमारतीमध्ये हा प्रकार घडलाय. या इमारतीमध्ये राहणाऱ्या आशा रायकर यांच्या घराचं दार बाहेरुन बंद होतं. शेजाऱ्यांनी दार उघडून आत जाऊन पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह घरात पडला होता. त्यांनी तातडीनं ही माहिती पोलिसांना दिली.  आशा यांची हत्या झाली की हा अपघात आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आव्हान विष्णू नगर पोलिसांसमोर होतं. त्यांनी दोन तासांच्या तपासानंतर या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वसंत निवास आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी इमारतीमध्ये बाहेरचं कुणी आलं नाही, हे निष्पन्न झालं. या इमारतीत राहणारा यश विचारे हा तरुण संशयास्पद हलचाल करत होता, हे पोलिसांच्या लक्षात आले.  

ट्रेंडीग बातमी -  मुंबईच्या आईस्क्रीममध्ये कसं आलं माणसाचं तुटलेलं बोट? गाझियाबादशी आहे कनेक्शन

पोलिसांनी यशला ताब्यात घेतले. तो काही तो बोलण्यास तयार नव्हता. यशला दारुचे व्यसन आहे. विष्णूनगर पोलिसांनी यशच्या काही मित्रांना विचारपूस करण्यासाठी पोलिस ठाण्यात आणले. त्यापैकी एका मित्राने सांगितले की, यश याने दुपारीच त्याच्या मोबाईलवर मेसेज केले होता. 'आजा दारु पिते है. कल शायद जमा होना पडेंगा',  या मेसेजमुळे तोच मारेकरी असल्याचं स्पष्ट झालं.

Advertisement

का केली हत्या?

यशनं ऑनलाईन बेटिंगमध्ये 60 हजार रुपये गमावले होते. त्यामुळे त्याला पैशांची अत्यंत गरज होती. त्याला दारुचं व्यसन असल्यानं मित्रासोबत दारु पार्टी करायची होती. इमारतीच्या लिफ्टपाशी उभा असताना त्याला आशा रायकर यांच्या गळ्यात आणि कानातले दागिने दिसले. ते पाहून त्याची नियत फिरली. तो आशा यांच्या घरात गेला. त्यानं घरामध्ये त्यांची गळा दाबून हत्या केली. कानातील गळयातील दागिने घेऊन बाहेर पडला. त्याने दागिने सोनाराकडे गेले. त्यापैकी गळ्यातील चैन ही सोन्याची होती. तर कानातील रिंग नकली होते. सोन्याचे चेन विकून त्याला 17 हजार रुपये मिळाले. त्यातून त्याने पार्टी केली. यश विचारेला पोलिसांनी अटक केली आहे. 
 

Topics mentioned in this article