Washim News : मुलीची छेड काढण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाची धारदार शस्त्राने हत्या

या प्रकरणात भागवत धोंगडे (वय 23) वैभव गूंजकर, (वय 21) सागर मापारी, (वय 21) विरेंद्र खडसे, (वय 19) गौरव गवळी, (वय 20) अभिषेक इरतकर (वय21) विश्वेश टेलगुते, सचिन कोठेकर यांचा सहभाग आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins

साजन ढाबे, वाशिम

वाशिम शहरात वाढणाऱ्या अपराधाच्या घटनांमुळे नागरिक भयभीत  आहेत. अशात काल सायंकाळी (29 ऑगस्ट) रोजी शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला एकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. तालुक्यातील काटा येथे वास्तव्यास असलेला राहुल हिंमतराव वाघ (29 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वाशिम शहर पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर इतर 2 आरोपीचा पोलीस शोध घेत घेत आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, राहुल हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या हिवरा गायकवाड येथील होता. मात्र वाशीम तालुक्यातील काटा येथे नातेवाईकांकडे तो गेल्या दहा वर्षांपासून वास्तव्यास होता. वाशीम येथील खासगी रुग्णालयात तो कामाला होता. दरम्यान गुरुवारी दुपारी 4.30 च्या सुमारास चार युवकांनी त्याचा पाठलाग केला. यानंतर पोलीस ठाण्यामागे त्याला मारहाण करुन धारदार शस्त्राने भोसकून त्याची हत्या केली. मुलींची छेड काढण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊन हाणामारीपर्यंत गेला. त्यातूनच हा खून झाल्याची माहिती आहे.

हत्येचं कारण काय?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गावातील एका मुलीचे एका मुलाशी प्रेम संबंध होते. मृतक राहुलने या दोघांना सोबत पाहिल्याने तुझ्या घरी सांगतो अशी मुलीला धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या मुलीने सदर बाब आपल्या प्रियकराला सांगितली. घरी सांगण्याची धमकी दिल्याने प्रियकराने आपल्या सात मित्रांसह मृतक राहुल वाघ याला हॉटेल व्यंकटेशजवळ बेदम मारहाण केली. या टोळक्यातील वैभव उर्फ खंजर नागोराव गुंजकर या  तरुणाने राहुलवर धारधार शस्त्राने वार केले. त्यानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. मात्र यामध्ये राहुल गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

भरदिवसा शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली. पोलीस ठाण्याला लागूनच भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. त्या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. 

Advertisement

(नक्की वाचा-  हलोsss मी मुंबई पोलीस बोलतो, एक फोन कॉल अन् निवृत्त मेजर जनरल झाला कंगाल)

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटना स्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. या प्रकरणात भागवत धोंगडे (वय 23) वैभव गूंजकर, (वय 21) सागर मापारी, (वय 21) विरेंद्र खडसे, (वय 19) गौरव गवळी, (वय 20) अभिषेक इरतकर (वय21) विश्वेश टेलगुते, सचिन कोठेकर यांचा सहभाग आहे. 

(नक्की वाचा- आधी सहकार्याची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली, चक्रावून सोडणाऱ्या 'त्या' हत्याकांडाचे गुढ उकललं)

पोलिसांनी या प्रकरणी  8 जणांविरुद्ध  503/2024, 103(1), 189(2), 189(4),190, 191(2), 19 (3) या कलमान्वये वाशीम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. वाशिम शहर पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. तर इतर 2 आरोपीचा पोलीस शोध घेत असून आरोपींना शोधण्यासाठी दोन पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article