राज्यात महिलांवरील अत्याचार कमी होण्याचं नाव घेत नाही. मुंबई, कल्याण, पुणे पाठोपाठ आता जालन्यातही अशीच भयंकर घटना घडली आहे. इथं होणाऱ्या पती समोरच एका तरुणीवर अत्याचार करण्यात आले. जालना शहरातच रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी तिच्या होणाऱ्या पतीला त्या नराधमांनी ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांच्या समोरच तिच्यावर अत्याचार केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जालन्यातील एका तरुणीचे लग्न ठरले होते. ती आपल्या सुखी संसारीची स्वप्न पाहात होती. पण तिच्या स्वप्नालाच काही नराधमांनी तडा दिला आहे. ही धक्कादायक घटना जालना शहरात घडली आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ही तरुणी जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेली होती. शहराच्या नुतन वसाहत परिसरात ती डब्बा घेवून गेली होती. दोघांचे जेवण झाल्यानंतर ते गप्पा मारत घराच्या दिशेने जात होते.
गप्पा मारत ते जालना रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या भुयारी पुलाखालून घरी जात होते. त्याच वेळी तरुणीला ओळखणार एक तरूण तिथे आला. प्रेम रवी पाचंगे असं त्याचं नाव होतं. त्याने त्या दोघांनाही अडवले. त्यानंतर मला तरुणी बरोबर बोलायचे आहे असं तो बोलू लागला. त्यानंतर तिला ओढत त्याने बाजूला असलेल्या नाल्याच्या दिशेने तिला नेले. तिथेच त्याने तिच्यावर अत्याचार केले.
हा प्रकार घडत असताना तिचा होणार पती तिथे होता. त्याला धमकावण्यात आलं होतं. तू आवाज केलास तर तुला ठार मारेन असं त्याला धमकावण्यात आलं होतं. त्याने होणाऱ्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ठार मारण्याची वारंवार धमकी देण्यात आली होती. त्याच स्थिती तरुणीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर या दोघांनी कशीबशी तिथून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर ते थेट पोलिस स्थानकात गेले. त्यांनी झालेली हकीगत पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.