जाहिरात

CIDCO Lottery: सिडकोचं चाललंय तरी काय? 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' यासाठी आता पुन्हा...

अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदार अधिक माहितीसाठी 9930870000 व 8062368000 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतात.

CIDCO Lottery: सिडकोचं चाललंय तरी काय? 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' यासाठी आता पुन्हा...
नवी मुंबई:

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या 26,000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे 12 ऑक्टोबरला घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर दोन वेळा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.सिडकोच्या या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचा सिडोकोचा दावा आहे. यापार्श्वभूमीवर आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोनं घेतला आहे. त्यामुळे हक्काचं आणि पसंतीचं सिडकोचं घर घेवू इच्छिणाऱ्यांना आता आणखी एक संधी मिळणार आहे. यासाठीची नवी तारीख सिडकोनं जाहीर केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'माझे पसंतीचे सिडकोचे घर' यासाठीची नोंदणी 12 ऑक्टोबरला सुरूवात झाली. सुरूवातीला 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. पण ही मुदत पहिल्यांदा वाढवण्यात आली. त्यानुसार 11 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र अर्ज करताना येणाऱ्या अडचणी. आणि इच्छुकांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेता ही मुदत पुन्हा एकदा सिकडोने वाढवली होती. त्यानुसार 26  डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार होते. ही दुसऱ्या वेळी दिलेली मुदत वाढ होती. ही मुदत नुकतीच संपली. 

ट्रेंडिंग बातमी - party fund:कोणत्या पक्षाला किती डोनेशन? भाजप पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचा नंबर कितवा?

त्यानंतर सिडकोने अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या तारखे नुसार आता ज्यांना 'माझे पसंतीचे सिडकोचे घर'या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. त्यांना  10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. सिडकोने ही तिसऱ्यांदा   मुदतवाढ दिली आहे. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत 26,000 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या भागत ही घरं आहेत. 

ट्रेंडिंग बातमी -  मुलाचा तरणाबांड मित्र आवडायला लागला, भाजप आमदाराची मामी मोहिनीने नवऱ्याचा 'असा' काटा काढला

दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे 12 ऑक्टोबरला सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेची घोषणा केली होती. या अंतर्गत 26,000 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरं उपलब्ध आहेत. सर्वांना परवडतील अशा दरात ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.  दरम्यान या घरांच्या किंमती सिडकोने अजूनही जाहीर केलेल्या नाहीत. शिवाय त्याची लॉटरी कधी निघणार हे ही गुलदस्त्यात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder Case:'तो माझ्या जवळचा असला तरी', धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले

दरम्यान या गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाईन अर्जनोंदणी 10 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदार अधिक माहितीसाठी 9930870000  व 8062368000 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतात, असे आवाहन सिडको मार्फत करण्यात आले आहे. शिवाय नोंदणी करताना बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आणि 100 किंवा 500 रु. मूल्याच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अटही या पूर्वीच शिथील करण्यात आली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com