विष्णु बुरगे, लातूर: कळंबला पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला कळंब पोलिसांनी रात्रीची गस्त घालताना जबर मारहाण केली. या मारहाण झालेल्या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला असून पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच जोपर्यंत कारवाई होणार नाही गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
Dating App Scam: डेटिंग अॅपवरचा नाद नडला; WhatsApp वर गोड बोलून वृद्धाची 73.72 लाखांची फसवणूक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळंब तालुक्यातील ढोराळा गावचे भैरू चौधरी हे दिनांक4-07-2025 रोजी कळंबला पत्नीला भेटण्यासाठी गेले होते. कळंब पोलीसांनी रात्रीची गस्त घालत असताना रात्री ठीक 12.30 च्या दरम्यान उचलून नेले व पोलीस ठाणे कळंब येथे नेहून जबर मारहाण केली व पहाटे 5 च्या दरम्यान सोडून दिले.
या मारहाणीनंतर लहान भाऊ लहू चौधरी यांनी त्यांना ढोराळा या ठिकाणी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी दिनांक 6 जुलै रोजी मुरुड येथील समर्थ हॉस्पिटल येथे आणण्यात आले. त्यांना उपचार करुन गावाकडे नेहण्यात आले.मात्र पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरुड या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचाराआधीच मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांच्या मारहाणीमुळे भैरू चौधरी याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत जोपर्यंत कारवाई होणार नाही गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. नातेवाईकांच्या याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.