कोकणात सध्या निवडणुकीचा धुरळा उडतोय. एका मागून एक दिग्गजांच्या सभांनी वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि आता राज ठाकरे कोकणाच्या मैदानात उतरले आहे. राज ठाकरे नारायण राणेंसाठी कणकवलीत सभा घेणार आहेत. यावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता जिव्हारी लागणारा प्रश्नच आदित्य यांनी विचारत मनसेला डिवचलं आहे. थेट विषयालाच हात घातल विचारलेल्या या प्रश्नाला आत राज ठाकरे त्यांच्या सभेतून उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आदित्य यांचा 'मनसे' प्रश्न
आदित्य ठाकरे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी चिपळूणला आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. नारायण राणेंनाही लक्ष केले. पण सर्वांचे लक्ष वेधले गेले ते त्यांनी मनसेला विचारलेल्या एका प्रश्नाने. राज ठाकरे आज ( शनिवार) कणकवलीत राणेंसाठी सभा घेणार आहेत. त्याबाबत आदित्य यांना विचारण्यात आले. त्यावर आदित्य म्हणाले मला मनसेच्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. भाजपने गुजरातमध्ये प्रकल्प पाठवण्याचा सपाटा लावला आहे त्याला तुमचा 'बिनशर्त ' पाठिंबा आहे का? असे विचारत त्यांनी मनसेला डिवचले आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क वरच्या सभेत मोदींना बिनशर्त पाठिंब्याची घोषणा केली होती. तो धागा पकडत आदित्य यांनी हा प्रश्न विचारला.
हेही वाचा - निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचं सांगत काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं
मनसेकडून उत्तर मिळणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कणकवलीत होत आहे. उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी कणकवलीतच सभा झाली. यासभेत त्यांनी मोदी शहांसह नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतला. त्याला राज हे प्रत्युत्तर देण्याची दाट शक्यता आहे. शिवाय आदित्य ठाकरेंनी ज्या पद्धतीने डिवचले आहे त्याला राज काय उत्तर देणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा - कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं?
भास्कर जाधवांनीही केली होती टिका
भास्कर जाधवांनीही या आधी मनसैनिकाना डिवचलं होते. मनसैनिक हे मुळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ द्यावी असं आवाहन केलं होतं. त्यावरून जाधव यांनी मनसैनिकांनी प्रत्युत्तरही दिलं होतं. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही मनसेला डिवचलं आहे. कोकणात रायगडमध्ये सुनिल तटकरे आणि रत्नागिरीत नारायण राणे यांचा प्रचार सध्या मनसैनिक करत आहेत.