Navneet Rana: नवनीत राणांचे फडणवीसां समोरच 'मी पुन्हा येईन', फडणवीसांची सभा नवनीत राणांनी गाजवली

अमरावती जिल्ह्यातील धारणी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

राज्यात सध्या नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर प्रचाराचा धुरळा उडवला आहे. जास्तीत जास्त नगरपालिकांच्या प्रचारासाठी ते सभा घेत आहेत. विदर्भात त्यांनी सभांचा धडाका लावला आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी नगरपरिषदेच्या प्रचारासाठी ते आले होते. ही सभा फडणवीसांची होती पण ती गाजवली मात्र माजी खासदार नवनीत राणा यांनी. त्यांनी फडणवीसां समोरच मी पुन्हा येईनचा नारा दिला. त्याला त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे याचीच चर्चा जिल्ह्यात रंगली होती. 

अमरावती जिल्ह्यातील धारणी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. त्यावेळी व्यासपीठावर माजी खासदार नवनीत राणा उपस्थित होत्या. नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात त्यांचा झालेल्या लोकसभेतील पराभवाची सल बोलून दाखवली. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात दिसत होते. त्यातून त्यांनी पराभूत झाले असले तरी मी पुन्हा येईनचा नारा दिली. त्यावेळी उपस्थितीतांनी ही त्याला भरभरून दाद दिली. मी पुन्हा येईन वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केले गेले होते. पण ते पुन्हा आले. त्यांनी जे बोलले होते ते करून दाखवले. 

नक्की वाचा - संसार सुरु होण्यापूर्वीच संपला! लग्नाच्या मंडपात नवरदेवाचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिसाद दिला. त्यांनी भाषणाच्या सुरूवातीला नवनीत राणा यांचा उल्लेख केला. शिवाय आपली लहान बहीण असं ही ते म्हणाले. आपले घरातील संबंध आहेत असू म्हणून माजी खासदार नवनीत राणा असा उल्लेख त्यांनी भाषणात केला. पण लगेचच पुढे त्यांनी त्या आता माजी खासदार राहणार नाहीत, असं म्हणत सर्वांनाच कोड्यात टाकलं. त्यामुळे नवनीत राणा यांना पुन्हा संधी मिळणार का याची चर्चा सुरू झाली. 

नक्की वाचा - Sindhudurg News: राणेंनी डाव टाकला! मालवण नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, कोण चेकमेट होणार?

नवनीत राणा यांनी ही मी पुन्हा येईन चा नारा फडणवीस यांच्या स्टाईलने दिला खपरा. पण त्या कशा पुन्हा येणार हा मात्र प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणूका अजून लांब आहेत. त्यात फडणवीसांनी त्या लवकर माजी राहाणार नाही असं जाहीर आश्वासन दिलं. त्यामुळे त्या राज्यसभेवर जाणार की विधान परिषदेत त्यांची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना नवनीत राणा यांनी आपल्या देवा भाऊवर आपला विश्वास आहे. त्यांनी दिलेला शब्द ते पाळतात. त्यामुळे त्यांनी नक्कीच काही तरी विचार केला असेल असं म्हणत त्यांनी ही आपल्या पदरात भविष्यात काही तरी पडणार आहे अशी आशा व्यक्त केली. 

Advertisement