अनंत गीतेंनी मनातली गोष्ट बोलून दाखवली, थेट पंतप्रधान पदावर दावा?

जाहिरात
Read Time: 2 mins
रायगड:

रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या एका वक्तव्याने सर्वच जण चकीत झाले आहे. रायगडमध्ये आज ( मंगळवार) मतदान झालं. त्यानिमित्ताने अनंत गीते यांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी मोठं वक्यव्य करत आपली इच्छाच बोलून दाखवली, 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्यात थेट लढत होत आहे. ही निवडणूक आपल्यासाठी सोपी असल्याचा ठाम विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे. गीते मतदान करत नाही असा आक्षेप सुनिल तटकरेंचा आहे. याला उत्तर देताना मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढतात. पण मतदान गुजरातमध्ये करतात. असं असताना गुजरातमधील एक व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्रातील आणि रायगडची व्यक्ती का पंतप्रधान होऊ शकत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या विशेष मुलाकतीत ते बोलत होते. 

हेही वाचा - Video : मतदार असावा तर असा! दोन्ही हात नाहीत तरी तरुणानं पायानं केलं मतदान

यावेळी बोलताना त्यांनी आमदार भरत गोगावले यांचा देखील समाचार घेतला. रायगड लोकसभा मतदारसंघात मशाल घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे विजय हा आपलाच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय भावी पंतप्रधान होण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. रायगड लोकसभा मतदार संघात गीतें विरूद्ध तटकरे असा सामना रंगत आहे. मागिल निवडणुकीतल्या पराभवाचा वचपा काढण्याचा गिते यांचा मानस आहे. मात्र तटकरेंनीही मतदार संघात चांगला जोर लावला आहे. त्यामुळे इथली लढत ही अटीतटीची होत आहे.    

Advertisement