मतदानासाठी थेट अमेरिकेहून आला पण... वाचा कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आयोगाच्या सावळ्या गोंधळाचा फटका सहन करावा लागत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
कल्याण:

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आयोगाच्या सावळ्या गोंधळाचा फटका सहन करावा लागत आहे. फक्त डोंबिवली विधानसभा मतदारसंघातली 50 हजारांपेक्षा जास्त जणांची नावं मतदार यादीतून डिलिट झाली आहेत, असा अंदाज डोंबिवलीचे जागरुक नागरिक अक्षय फाटक यांनी केलाय. त्यांनी या विषयावर उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केलीय. त्यातच मतदान करण्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास आणि काही हजार रुपये खर्च करणाऱ्या नागरिकांचीही निराशा झालीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अवधूत दातार हा तरुण अमेरिकेतून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता. मात्र मतदार यादीमध्ये त्याचं नाव नसल्यानं त्याला धक्का बसलाय. त्यानं वेगवेगळ्या मतदारसंघातून पायपीट करुन आपलं नाव आहे का हे तपासलं, पण त्याला निराशात सहन करावी लागली. यापूर्वी नेहमी मतदान करुनही यंदा अचानक नाव डिलिट झाल्यानं दातार यांनी निराशा व्यक्त केलीय.  कल्याणमधल्या अनेक नागरिकांची नावं मतदार यादीमधून गायब झाली आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. हीच लोकशाही आहे का? असा सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा मतदान करावं अशी मागणी केलीय.

दुबईहून मतदानासाठी आला पण....

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जवळपास 50 हजार खर्च करुन 1900 किलोमीटरचा करुन मुंबईत आलेल्या एका मतदाराचा हिरमोड झाला आहे.निशित पारेख असं या मतदाराचं नाव आहे. निशित खास मतदान करण्यासाठी दुबईहून मुंबईत आले होते. मात्र मतदार यादीत त्यांचं नावच नसल्याना त्यांना मतदान करता आलेलं नाही.  

(नक्की वाचा : कल्याण लोकसभा मतदारसंघातील 50 हजार नावं गायब? डोंबिवलीकर मागणार उच्च न्यायालयात दाद )

निशित यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ते घाटकोपर पश्चिम येथील मतदान केंद्रावर 7 वाजेच्या आधीच पोहोचले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी मतदार यादीत आपलं नाव शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचं नावच मतदार यादीत सापडलं नाही. मतदान करण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करुन ते आल्याने त्यांनी तिथे खूप चौकशी केली. जवळपास 11 वाजेपर्यंत ते मतदार केंद्रावर थांबले होते. मात्र मतदान करता येणार नाही, हे निवडणूक कर्मचाऱ्यांनी कळवल्यानंतर ते निराश होऊन घरी परतले. 

Advertisement


 

Topics mentioned in this article