Beed Vidhan Sabha : उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू, बीडमधील मन सुन्न करणारी घटना

बीड विधानसभा मतदारसंघातून (Beed Vidhan Sabha) मोठी बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
बीड:

बीड विधानसभा मतदारसंघातून (Beed Vidhan Sabha) मोठी बातमी समोर आली आहे. बीड विधानसभेत एका अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. 

आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यभरात 45.50 टक्के मतदान पार पडलं आहे. दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बाळासाहेब शिंदे अवघे 43 वर्षांचे होते. ते बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. राज्यभरात मतदान सुरू असताना ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंदावर थांबले होते. त्यावेळी त्यांना चक्कर आली अन् ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान या दुर्दैवी घटनेने बीड शहरासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - बीडमध्ये मुंडे समर्थकांचा राडा; शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

बीड विधानसभेतील लढत...
बीड विधानसभेत महायुतीकडून योगेश क्षीरसागर  आणि महाविकास आघाडीतून संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये लढत आहे. मात्र मतदान पूर्ण झाल्याच्या आधीच उमेदवाराचा मृत्यू झाल्याने येथील निवडून रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.      

Advertisement