- बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग येथील महिला बचत गटाच्या महिलांना पिंपरी चिंचवडमध्ये बोगस मतदानासाठी नेण्यात आलं होतं
- महिलांना देवदर्शनासाठी जेजूरीला नेणार असल्याचं सांगून रात्री पिंपरी चिंचवडमध्ये नेलं
- महिलांना मतदानासाठी बोगस मतदान कार्ड देऊन दबावाखाली मतदान करायला लावण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे
आकाश सावंत
पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची मतदान प्रक्रिया पार पडली. शिवाय नुकताच निवडणुकीचा निकाल ही लागला आहे. मतदान करून जनतेने आपला कौल ही दिली आहे. मात्र या निकालानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे य निकालावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीनंतर दुबार मतदार आणि बोग मतदार हा मुद्द ऐरणीवर आला होता. त्यात बीडच्या महिलांना पिंपरी चिंचवडमध्ये आणून बोगस मतदान करायला लावण्यात आले. बोगस मतदान केलेल्या महिला आता समोर आल्या आहेत. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे महिला बचत गट आहे. या बचत गटात अनेक महिला काम करतात. या महिलांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र केलं. शिवाय तुम्हाला देव दर्शनासाठी जेजूरीला घेवून जात आहोत असं या महिलांना सांगण्यात आलं. देवदर्शनाला जायचं आहे म्हणून महिला ही तयार झाल्या. त्यानंतर त्यांना 14 जानेवारी रोजी रात्री एका गाडीत बसवण्यात आलं. सकाळ झाली तेव्हा या महिला जेजूरीला नव्हत्या. त्या जेजूरी ऐवजी पिंपरी चिंचवडला पोहोचल्या होत्या. प्लॅन चेंज झाला आहे असं त्यांना सांगण्यात आलं.
15 जानेवारी रोजी सकाळी त्या पुण्यात होत्या. त्याच वेळी त्यांच्या हातात बोगस मतदान कार्ड देण्यात आलं. शिवाय आता तुम्हाला मतदान करायचं आहे असं ही सांगण्यात आलं. महिलांवर दबाव टाकून त्यांना मतदान करण्यात भाग पाडले गेले असा त्यांचा आरोप आहे. अनेक महिलांना हा काय प्रकार चालला आहे हे मात्र लक्षात आले नाही. त्यामुळे महिलांनी आता थेट तिथून आल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या झालेल्या सर्व प्रकारावर आता पोलीस प्रशासनासह निवडणूक निर्णय अधिकारी देखील काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गटाची मिटींग असल्याचं सांगण्यात आलं. पण तसं झालं नाही. जेव्हा आम्हाला मतदान करायला सांगितलं तेव्हा आम्ही घाबरलो. पोलीस म्हणाले घाबरू नका. पैसे ही दिल्या नाहीत. मतदानासाठी चार बस भरून पुण्यात गेल्या होत्या असं ही त्यांनी सांगितलं. बचत गटाच्या सर्व महिल्या होत्या. पुण्यात बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. बचत गटाच्या मंदा चव्हाण यांनी हा आरोप केला आहे. आमची फसवणूक करण्यात आली आहे असं ही त्या म्हणाल्या. पोलीसांनी आम्हाला पकडलं होत. दिवसभर पोलीसात बसवून ठेवलं होतं. आम्ही सर्व महिला रडत होतो. शेवटी पोलीसांनी आम्हाला सोडलं असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.