Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय

Vidhan Parishad Election 2024 Result : 2019 मधील विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कमबॅक केलं आहे

Advertisement
Read Time: 2 mins
P
मुंबई:

Vidhan Parishad Election 2024 Result : 2019 मधील विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कमबॅक केलं आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होतं. पंकजा यांनी त्यापेक्षा 3 जास्त म्हणजेच 26 मत मिळवत विजय मिळवला आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) मतदान झालं. या निवडणुकीत भाजपानं पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती.  भाजपाकडं असलेल्या संख्याबळाच्या जोरावर पंकजा यांचा विजय निश्चित मानला जात होता. 

पंकजा मुंडेंचं कमबॅक

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद सांभाळलेल्या पंकजा मुंडे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. परळी या त्यांच्या बालेकिल्ल्यात धनंजय मुंडे यांनी पंकजांना पराभूत केलं. त्यानंतर सातत्यानं त्यांचं राजकीय पूनर्वसन करण्यात यावं अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. यावर्षी झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पराभव केला.

( नक्की वाचा : दहावी पास मिलिंद नार्वेकर आहेत कोट्यधीश, ठाकरेंच्या विश्वासूची एकूण संपत्ती उघड )

पंकजा यांच्या पराभवाचे बीडमध्ये जोरदार पडसाद उमटले. मराठा विरुद्ध ओबीसी वादामध्ये हा पराभव झाल्याचं मानलं जात होतं. पंकजा मुंडे यांच्या काही समर्थकांनी या पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं आत्महत्या केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभरातच पंकजा यांनी विधानपरिषदेत विजय मिळवला. या विजयानंतर पंकजा यांचा मंत्रिपदही नक्की मानलं जातंय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.

Advertisement

पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपल्यानं मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत आनंद साजरा केला.