मोठा गौप्यस्फोट! प्रतिभा धानोरकरांचा 'लाख' मोलाचा विजय, पडद्यामागून कोणाची मदत?

विजयानंतर प्रतिभा धानोरकर यांना आतली बातमी सांगितली आहे. विजयामध्ये कोणाची मदत झाली हे सांगितल्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि मंत्री सुधिर मुनगंटीवार यांचा मोठा पराभव झाला आहे. मुनगंटीवार यांना आस्मान दाखवत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या जायंटकिलर ठरल्या आहेत. विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर यांनी आपले पती बाळू धानोरकर यांच्या पेक्षा अधिक मताधिक्य मिळवलं. जवळपास 2 लाख 60 मतांच्या फरकाने विजय नोंदवला. या विजयानंतर प्रतिभा धानोरकर यांनी आतली बातमी सांगितली आहे. विजयामध्ये कोणाची मदत झाली हे सांगितल्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
  
विजयी झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांच्या विजयी रॅलीचे वणी येथे नियोजन केले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांने गावागावात जावून प्रचार केला. फाटका कार्यकर्त्याही छातीठोक पणे सांगत होता ताई विजय तुमचाच होणार, त्यामुळे आपला विजय पक्का होता हे सुरूवातीपासूनच माहित होते असे यावेळी धानोरकर म्हणाल्या. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मदत केलीच त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले. मात्र पडद्या मागून भाजपच्या लोकांनीही मदत केली. काँग्रेसला मतदार व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले असा दावा त्यांनी यावेळी केला. त्या सर्व भाजपच्या लोकांचेही त्यांनी आभार मानले. 

हेही वाचा -  उपोषणाला परवानगी नाही, तरीही जरांगे उपोषणावर ठाम, प्रशासनाची डोकेदुखी वाढणार?

प्रतिभा धानोरकरांनी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेतले आहे. त्यांना एकूण 7 लाख18 हजार 410 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या सुधिर मुनगंटीवार यांचा जवळपास 2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव केला. याबाबत बोलताना त्यांनी आपल्याला पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड मतदारांनी दिल्याचा आवर्जून उल्लेख केला. 

Advertisement