मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. हे आंदोलन आज शनिवारपासून सुरू होत आहे. मात्र या आंदोलनासाठी प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली आहे. गावात आंदोलनाला परवानगी देवू नये अशी तक्रार तहसीलदारांकडे गावातल्याच काही लोकांनी आणि जरांगेंच्या जुन्या सहकार्यांनी केली होती. त्यामुळे त्यांना परवागनी नाकारण्यात आली. त्यामुळे जरांगे आता काय करणार असा प्रश्न होता. पण परवानगी नसली तरीही आंदोलन करणारच अशी भूमीका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार हे आंदोलन ते अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसणार आहेत. पण प्रशासनाने त्यांना आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. अशा स्थितीत ते आंदोलन करणार असतील तर प्रशासनाची डोकेदुखी यामुळे वाढणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि प्रशासन यांच्यात वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - धक्कादायक! गुदद्वारात कॉम्प्रेसरने भरली हवा, लहान मुलासोबत घडला भयंकर प्रकार
जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बसला. मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. याचा सर्वाधिक परिणाम हा मराठवाड्यात दिसून आला. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवें सारख्या दिग्गजालाही पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत विधानसभा निवडणुका हा काही महिन्यावर आल्या आहेत. जरांगे यांनी याआधीच मराठा उमेदवार विधानसभेला उभे करणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचे आताचे उपोषण जास्त महत्वाचे ठरते. मात्र त्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. शिवाय काही झाले तरी उपोषणावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world