- मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी महायुतीस मोठं आव्हान दिलं आहे
- उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मुंबई महापौर उत्तर भारतीय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे
- उत्तर भारतीय विकास सेना निवडणूक लढवणार आहे
महापालिका निवडणुकीचे जोरदार वारे राज्यभर वाहत आहेत. त्यात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती मुंबई महापालिकेची. मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांनी महायुती समोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. महायुतीला ठाकरेंकडून सत्ता खेचून घ्यायची आहे. तर दुसरीकडे ठाकरेंना मुंबईवरची आपली पकड काही केल्या सोडयची नाही. अशा आता मराठी विरुद्ध परप्रांतिय हा मुद्दा जोर पकडत आहे. त्यात आता एका नेत्याने मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होऊ शकतो असं वक्तव्य करत एकच खळबळ उडून दिली आहे.
मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांचे एक वेगळी वोट बँक आहे. ही मतं कधी काळी काँग्रेसच्या बाजूने होती. तर कधी ती भाजपच्या मागे उभी राहील. पण दोन्ही पक्षांनी त्यांची उपेक्षा केल्याची तक्रार उत्तर भारतीय विकास सेनेची आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर भारतीय महापौर होण्याची संधी निर्माण झाली असल्याचं वक्तव्य उत्तर भारतीय विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केलं आहे. यावेळी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर भारतीय विकास सेना ही निवडणूक लढवणार आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो. आम्ही उत्तर भारतीय विकास सेना ही निवडणूक लढवणार आहोत असं ही शुक्ला यांनी सांगितलं. महापौरपद हे अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याची ही आमची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अडीच वर्ष आमची आणि अडीच वर्ष मराठी महापौराची असतील. मराठी महापौर अडीच वर्षासाठी बसवण्यासाठी आमची तयारी आहे असं ही त्यांनी सांगितलं. यावेळी उत्तर भारतीयांची भूमिका ठाम आहे असं सांगत ते म्हणाले, आम्हाला मारणारे आणि आम्हाला मार खाऊ देणारे यांना उत्तर भारतीय मतदान करणार नाही. सगळे पक्ष सारखे आहेत. मग काँग्रेस असो भाजपा असो. आम्हाला मनसेवाले मारत असताना हे लोकं गप्प होते असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका करण्याची संधी सोडली नाही. देवा भाऊ देखील हे आंधळ्या डोळ्याने सगळं बघत होते. तुम्ही आम्हाला उत्तर भारतीय उत्तर भारतीय म्हणता. मात्र आम्ही उत्तर भारतीय नसून इथेच जन्मलेले अमराठी मुंबईकर आहोत असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत होते. त्यामुळे याच ठिकाणी जन्माला आलेला उत्तर भारतीय, मग त्याचे नाव वेगळे असले तरी त्याला तुम्ही नाकारणार का? असा प्रश्न ही त्यांनी केला. त्यांनी आम्ही ही मुंबईकर असल्याचं सांगितलं.
या पुढे जावून ते म्हणाले की महापौर उत्तर भारतीय होऊ शकतो. पण आम्ही उत्तर भारतीय सेनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये मराठी लोकांना उमेदवारी देणार आहोत. त्यासाठई आमची तयारी आहे. बटेंगे तो पिटोगे हा माझा आधीपासूनचा नारा आहे असं ही शुक्ला यांनी सांगितलं आहे. उत्तर भारतीयांची मतं मिळावी यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न आहेत. काँग्रेसचा ही या मतांवर डोळा आहे. अशाच उत्तर भारतीय विकास सेना मैदानात उतरल्यास मतांची विभागणी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा फटका मात्र कोणाला बसलो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.