BMC Election 2026 Result : मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या पराभवाचे राज ठरले व्हिलन! 25 वर्षांचा गड अखेर कोसळला

BMC Election 2026 Result Live Update : गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे, मात्र यंदाच्या निवडणुकीत हे समीकरण पूर्णपणे बदलताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
BMC Election 2026 Result Live Update : उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेतील सत्ता संपुष्टात आली आहे.
मुंबई:

BMC Election 2026 Result Live Update : विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे, मात्र यंदाच्या निवडणुकीत हे समीकरण पूर्णपणे बदलताना दिसत आहे.

मुंबईचा हा शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वस्व पणाला लावले होते, पण त्यांचे काही निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

राज ठाकरेंसोबतची युती ठरली घातक

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घटना मानली गेली, परंतु निवडणुकीच्या निकालात ही युती उद्धव ठाकरेंसाठी आत्मघातकी ठरल्याचे बोलले जात आहे. 

राज ठाकरे यांची प्रतिमा उत्तर भारतीय विरोधी नेता अशी राहिलेली आहे. त्यांच्यासोबत हातमिळवणी केल्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचा मोठा गट उद्धव ठाकरेंपासून दुरावला. मुंबईच्या अनेक भागांत उत्तर भारतीय मतदारांची संख्या निर्णायक आहे, आणि राज ठाकरेंसोबत गेल्यामुळे हे मतदार थेट भाजपच्या बाजूने वळल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Election Result 2026 : लातूरमध्ये काँग्रेसला बहुमत, संभाजीनगर, नांदेडचे अपडेट काय? मराठवाड्याचे सर्व अपडेट )

25 वर्षांची अँटी इनकंबन्सी आणि लोकांचा कौल

मुंबई महापालिकेत सलग 25 वर्षे सत्तेत राहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या अँटी इनकंबन्सीचा म्हणजेच सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे. 

कोणत्याही पक्षाची दीर्घकाळ सत्ता राहिली की प्रशासनाविरुद्ध लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, त्याचाच फटका या निवडणुकीत बसला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा, खड्डे आणि पावसाळ्यातील पाण्याचा निचरा यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधकांनी ठाकरेंना घेरले होते. त्याचा परिणाम मतदानावर स्पष्टपणे दिसून येत असून मतदारांनी बदलाचा विचार केल्याचे दिसते.

Advertisement

प्रचाराच्या पद्धतीमधील मोठी तफावत

या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या पद्धतीत मोठी तफावत पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवून कार्यकर्त्यांमध्ये मिसळले आणि त्यांनी अनेक जाहीर सभा घेतल्या. भाजपने जमिनीवर उतरून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. 

याउलट, उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रमुख नेते केवळ पत्रकार परिषदा घेण्यावर मर्यादित राहिल्याचे दिसून आले. जनतेपर्यंत थेट पोहोचण्यात झालेला हा विलंब आणि रणनीतीमधील चूक यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाधार कमी झाल्याचे मानले जात आहे.

Advertisement

मराठी मतांचे विभाजन आणि भाजपची खेळी

ठाकरे बंधू नेहमीच मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करत आले आहेत आणि या निवडणुकीतही त्यांनी मराठी मतांवरच भिस्त ठेवली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपणही मराठीच असल्याचे ठासून सांगत भाजपला केवळ हिंदी भाषिक लोकांचा पक्ष म्हणणाऱ्यांना चोख उत्तर दिले. फडणवीस यांनी नागपूरचे संदर्भ देत मराठी लोकांच्या हक्कासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे मतदारांना पटवून दिले. यामुळे शिवसेनेच्या हक्काच्या मराठी मतपेढीमध्ये भाजपने मोठी खिंडार पाडली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुंबईतील वर्चस्व संकटात आले आहे.