गाड्या, बंगले, बँक बॅलन्स... अबब! नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?

जाहिरात
Read Time: 3 mins
रत्नागिरी:

नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांची संपत्ती किती आहे याची उलगडा झाला आहे. त्यांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारांपेक्षा राणेंकडची संपत्ती सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. त्यात गाड्या, बंगले, बँक बॅलन्स, रोख रक्कम, जामिन यांचा समावेश आहे. राणेंची संपत्ती पाहून अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत. 

हेही वाचा - हितेंद्र ठाकूरांकडे उमेदवारी मागण्यासाठी किती जण आले? ठाकूरांनी काय केले?


नारायण राणे यांची मालमत्ता

नारायण राणे यांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 49 लाख 53 हजार आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87 लाख 73 हजार 883 आहे. कौटुंबिक उत्पन्न 15 लाख 7 हजार 380 आहे. राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने तर 78 लाख 85 हजार 371 रुपयांचे डायमंड आहेत. पत्नी नीलम राणे यांच्याकडे 1 कोटी 31 लाख 17 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅम वजनाचे सोने आहे. 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे डायमंड आहेत. 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. सोने, चांदी व डायमंड असे कुटुंबाकडे 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचा किमतीचा ऐवज आहे.

Advertisement

राणेंची स्थावर मालमत्ता

केंद्रीय मंत्री राणे यांच्याकडे पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणवकवलीतील जानवली येथे जमीन आहे. कणकवलीत बंगला, अशी 8 कोटी 41 लाख 45 हजार 237 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. निलम राणे यांच्याकडे पनवेल, कणकवलीत जानवली, मालवण, कर्नाळा, कुडाळ, मालवणमध्ये गाळे, पुणे येथे ऑफिस, मुंबईत फ्लॅट अशी सुमारे 41 कोटी 1 लाख 82 हजार 765 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 

Advertisement

राणेंचा बँक बॅलन्स आणि रोख रक्कम

नारायण राणे यांच्या नावावर विविध बँकांमध्ये 12 कोटीची बँक डिपॉझिट आहे. तर नीलम राणे यांच्या नावावर सव्वा 2 कोटींची बँक डिपॉझिट आहेत. राणे यांच्याकडे 55 लाखांचा बँक बॅलन्स आहे. तर 72 हजारची रोकड आहे. शिवाय राणे यांच्याकडेही 72 हजारांची रोकड असल्याचहे ही या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Advertisement

राणेंकडे एकूण किती गाड्या? 

नारायण राणे यांच्या नावावर इनोव्हा, मर्सिडिज बेंज, मारुती इडिंगा या गाड्या आहेत. तर नीलम राणे यांच्या नावावर दोन स्कोडा, इको गाडी आहे. राणे कुटुंबीयांच्या नावावर मर्सिडिज बेंज या गाड्या आहेत. विविध कंपन्यांमध्येही त्यांचे शेअर्स व पार्टनरशिप आहे. त्याचे मूल्य जवळपास 63 कोटी रुपये आहे. नारायण राणे यांची वैयक्तिक संपत्ती 35 कोटी आहे. तर नीलम राणे यांच्याकडे 75 कोटींची संपत्ती आहे. कौटुंबिक संपत्ती 27 कोटीच्या घरात आहे. राणे हेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.


विरोधी उमेदवारांची संपत्ती किती?  

नारायण राणें विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे  6 कोटी 46 लाखांची संपत्ती आहे. तर अपक्ष उमेदवार शकील सावंत यांची संपत्ती 27 कोटी 33 लाखाच्या घरात आहे. शकील सावंत यांच्यावर 16 लाख 94 हजार एवढं कर्ज आहे. तर विनायक राऊत यांच्यावर 20 लाख 97 हजार 100 रुपयांचे कर्ज आहे.