VIDEO : पोलिसांना शिवीगाळ करणे भोवलं; भाजप खासदार कपिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी कपिल पाटील, दादा गोसावी, हर्षल पाटील, रवी सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 186, 504, 506  कलमांर्तग ही कारवाई करण्यात आली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह 4 जणांविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला होता. 

(नक्की वाचा-  देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी मतदारसंघात मतदानाच्या दिवशी बाळा कपाऊंड अवचित पाडा येथे कर्तव्यावर होते. तेथे काही भाजप कार्यकर्ते मतदान केंद्राच्या आत येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र घुगे यांनी त्यांना विरोध केला. या कार्यकर्त्यांने याबाबत कपिल पाटील यांना माहिती दिली असता ते तिथे आले आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांच्यासोबत वाद घालू लागले. यावेळी त्यांनी घुगे यांना शिवीगाळ करत त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. 

(नक्की वाचा - मुंबईतील एका श्रीमंत 'भिकारी'चा हत्येनं शेवट, मृत्यूपूर्वी कुटुंबाला दिलं आलिशान आयुष्य)

या प्रकरणी पोलिसांनी कपिल पाटील, दादा गोसावी, हर्षल पाटील, रवी सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 186, 504, 506  कलमांर्तग ही कारवाई करण्यात आली आहे. 

Advertisement

आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्वीटक केला होता. रोहित पवारांनी लिहिलं की, "केंद्रीयमंत्री राहिलेले भिवंडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात. अशाप्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुठून, असा प्रश्न पडतो. कदाचित सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचे विशेष संरक्षण असल्याने ही मस्ती येत असावी. असो, पण हा अहंकार आणि सत्तेची मस्ती चार जूनला उतरल्याशिवाय राहणार नाही!"

Advertisement

पाहा VIDEO

Topics mentioned in this article