मतदानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर; वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

उदय सत्यनारायण वर्मा असं भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. उदय वर्धा येथील पुलगाव मतदान केंद्रात मतदान करताना EVM मशीनचे फोटो काढले.

जाहिरात
Read Time: 2 mins
वर्धा:

सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ टाकणे सामान्य गोष्ट आहे. अनेकजण आपल्या रोजच्या जगण्याचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीचं भान देखील राखलं पाहिजे. असाच बेजबाबदारपण भाजप पदाधिकाऱ्याला महागात पडला आहे. EVM चा फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकणे, भाजप पदाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. भाजपच्या या पदाधिकाऱ्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

उदय सत्यनारायण वर्मा असं भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. उदय वर्धा येथील पुलगाव मतदान केंद्रात मतदान करताना EVM मशीनचे फोटो काढले. त्यानंतर मतदान करतानाचा व्हिडीओ शूट करुन तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. इन्स्टाग्रामवर स्टोरी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

(नक्की वाचा - मतदाराने कुऱ्हाडीने फोडलं EVM, नांदेडमधील मतदान केंद्रात प्रचंड गोंधळ)

उदय पुलगाव शहर भाजपा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. त्याने सकाळी 7.15 वाजता पुलगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 93 मध्ये मतदान केलं. त्यांनतर मतदान करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. पोलिसांना हा प्रकार समजताच पोलिसांनी या उदय वर्मा विरोधात कारवाई केली. 

(नक्की वाचा : सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप )

उदय वर्माने जिल्हा निवडणूक निर्णायक अधिकारी तथा जिल्हाअधिकारी वर्धा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आचार संहितेचा भंग केला. लोक प्रतिनिधी कायद्याचे उलंघन करून मतदानाची गुप्तता देखील भंग केली. स्वत: केलेल्या मतदानाचा प्रसार केल्याप्रकरणी त्याच्यावर भादवि कलम 188, लोकप्रतिनिधी कायदा 1951 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article