नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? पाहा VIDEO

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकूण 31 उमेदवार रिंगणात आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

प्राजंल कुलकर्णी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  मतदान करताना EVM कक्षाला महाराजांनी हार घातला होता. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्वामी शांतीगिरी मराहाज त्र्यंबकेश्वरच्या MVP महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाछी गेले होते. तिथे हा प्रकार घडला होता. शांतिगिरी महाराजांनी मतदान केंद्रात गैरवर्तवणूक केली. तसेच निवडणूक आयोगाच्या आदर्श नियमावलीचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नायब तहसीलदारांच्या तक्रारीनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हा कारवाई केली. 

नक्की वाचा- 50 हजार खर्च, 1900 किमीचा प्रवास; दुबईहून आलेल्या मतदाराच्या पदरी पडली निराशा  

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकूण 31 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज अशी तिरंगी लढत या मतदारसंघात बघायला मिळत आहे. 

Advertisement

Swami Shantigiri Maharaj
Photo Credit: Facebook - Swami Shantigiri Maharaj

(नक्की वाचा - धुळ्यात मतदानाचा उत्साह; 92 वर्षाच्या आजीबाई वनिता पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क)

दरम्यान मतदान करण्यापूर्वीच पहाटे 6 वाजता शांतिगिरी महाराज त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी महादेवाची पूजा करत अभिषेक केला. त्यानंतर बरोबर 7 वाजेच्या ठोक्याला महाराजांनी त्र्यंबकेश्वरमधील MVP महाविद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षाकवचाला हार घातला. माझ्यासोबत देव-देवतांचे आशीर्वाद असून योग्य उमेदवाराला मतदान करा, असं त्यांनी मतदारांना आवाहन देखील केले होते.

Topics mentioned in this article