Chandrapur News: भाजप शहराध्यक्षांची भलतीच डेअरिंग, परस्पर उमेदवारांची यादीच बदलली, पुढे जे घडलं ते...

ऐन निवडणुकीत भाजपमध्ये सुरू असलेला हा गोंधळ पक्षाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • चंद्रपूर भाजपमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी शहर प्रमुखांनी बदलल्याने वाद
  • महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांनी अंतिम यादीतील जवळपास दहा उमेदवार बदलले
  • पक्षाने या बदलांना अवमान मानून कासनगोट्टुवार यांना तत्काळ महानगर अध्यक्ष पदावरून हटवले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
चंद्रपूर:

अभिषेक भटपल्लीवार

महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली यासाठी मोठी रस्सीखेच दिसून आली. त्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा आटापीटा करावा लागत होता. त्यातून अनेक ठिकाणी बाहेरचे आणि एकनिष्ट असा वाद ही उफाळून आला होता. अशात चंद्रपूर भाजपमध्ये वेगळाच वाद पाहायला मिळाला आहे. प्रदेशस्थरावर अंतिम झालेली उमेदवारी यादी थेट शहर प्रमुखांनी कुणालाही कसलीही कल्पना न देता परस्पर बदलली. त्यामुळे शहर भाजपात एकच खळबळ उडाली आहे.   

चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना आज तडकाफडकी पदावरून काढण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली यादी कासनगोट्टुवार यांनी आपल्याच मताने परस्पर बदलली. त्यांनी जवळपास दहा पेक्षा जास्त उमेदवार बदलून टाकले. प्रदेशाध्यक्षांचा हा अवमान असल्याने पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यानंतर तात्काळ त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. याची चांगलीच चर्चा चंद्रपूरमध्ये रंगली आहे. 

नक्की वाचा - Akola News: पैसे घेवून तिकीट विक्री! व्हायरल व्हिडीओने एकच खळबळ, भाजप-काँग्रेस-एमआयएममध्ये असंतोष उफाळला

आता त्यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून तत्काळ प्रभावाने हटवण्यात आल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे पत्र जारी केले आहे. वर्षभरापूर्वीच कासनगोट्टुवार यांची या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीला मोठा विरोध पक्षात झाला होता. त्यांच्या कारवाया नेहमीच पक्षात वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यांचे शहाणपण आणि आगाऊचे धाडस त्यांच्या अंगलट आल्याची प्रतिक्रिया पक्षात उमटत आहे. 

नक्की वाचा - Tejashwi Ghosalkar: 'मला थांबवू नका,मी शिवीगाळ करत नाही' तेजस्वी घोसाळकरांसमोरच भाजपच्या रणरागिणीचा रुद्रावतार

ऐन निवडणुकीत भाजपमध्ये सुरू असलेला हा गोंधळ पक्षाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यात चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार यांच्यात शित युद्ध सुरू आहे. एकमेकांना शहकाटशह देण्याची एकही संधी हे दोघे सोडत नाहीत. त्यानेच स्थानिक भाजपनेते भरडले गेले आहेत. त्यात आता सुभाष कासनगोट्टुवार यांनी केलेल्या या कांडामुळे तर भाजपचे कार्यकर्ते हे संभ्रमात सापडले आहेत.  

Advertisement