प्रतीक्षा पारखी, पुणे
पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. समाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या नावे व इतर भागीदारांच्या नावे सिटी सर्व्हे नंबर 966/1 मालमत्तेवरील उत्कर्ष असोसिएटसने बांधकाम चालू आहे. मात्र रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा उल्लेख केला नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अन्वर शेख यांनी तक्रार केली आहे.
नक्की वाचा- भाजपाच्या घटनेनुसार पंतप्रधान मोदी रिटायर होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर
अन्वर शेख यांनी यापूर्वीही धंगेकर यांच्याविरोधात बाबरी मशिदीवर रामाचा फोटो लावून बॅनर लावल्याबद्दल तक्रार केली होती. अन्वर शेख यांनी म्हटलं की, पुणे लोकसभा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी वक्फ बोर्डाच्या 200 कोटींच्या मालमत्तेवर पत्नीचा हक्क सांगून ही मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि त्यावर काम सुरू केले.
( नक्की वाचा : उद्धव ठाकरेंसह देशातील बडे नेते जेलमध्ये जातील; अरविंद केजरीवालांचा मोठा दावा )
वक्फ बोर्डाची मालमत्ता खरेदी किंवा विकता येत नाही, असा नियम आहे. मात्र असं असतानाही सदर फ्लॅट विकण्यास सुरू केले आहे. निवडणूक आयोगाला चुकीचे प्रतिज्ञापत्र दिल्याने सध्या काम रखडले आहे. त्यामुळे यावर आम्ही आक्षेप घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे, अशी माहिती अन्वर शेख यांनी दिली आहे.