BMC Election 2026 : भाजपने निवडणूक लढवली असती तर...; शिंदे गटानंतर आता भाजपनेही व्यक्ती केली नाराजी

दादर-माहीम भागात शिंदे गटाची पिछेहाट झाली. सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये शिंदे गटाला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. त्यातही अनेक ठिकाणी शिवसेनेला धक्कादायक निकाल पाहावे लागले. त्यातही दादर-माहीम भागात शिंदे गटाची पिछेहाट झाली. सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

भाजपची मतं पडली नाहीत - समाधान सरवणकर

समाधान सरवणकर यांनी या अपयशामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपने माझ्या विरोधात प्रचार केल्याचं ते म्हणाले. दादर माहीम भागात शिवसेने नंतर आता भाजपने आपली नाराजी व्यक्त केली आहे. समाधान सरवणकर यांनी माध्यमांसमोर जाहीर केलं की,  त्यांचा पराभव भाजपमुळे झाला. कारण भाजपची मतं त्यांना पडली नाहीत. आता भाजपकडूनही या टीकेला उत्तर दिलं गेलं आहे. 

नक्की वाचा - Mumbai Mayor: ...तर ठाकरे गटाला लागणार महापौरपदाची 'लॉटरी'? कसं? वाचा सविस्तर

भाजपची मतं होती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिला नाही तर चौथ्या क्रमांकावर गेला असता - जितेंद्र राऊत

समाधान सरवणकर यांच्या टीकेला उत्तर देत जितेंद्र राऊत यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. भाजपची मतं होती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिला नाही तर चौथ्या क्रमांकावर राहिला असता असं त्यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचसोबत 191,192,194 प्रभागांमध्ये जर भाजपने निवडणूक लढवली असती तर आज त्यांचा विजय झाला असता हे असं देखील त्यांनी पोस्ट केलं आहे. 

Topics mentioned in this article