Read more!

Delhi Election Results : भाजपाला सत्ता, 'आप' आऊट, कोणता एक्झिट पोल ठरला सर्वात अचूक?

Delhi Election Results 2025, Exit Polls : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीतील 70 पैकी 48 जागांवर भाजपानं विजय मिळवलाय. आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Delhi Election Results 2025, How accurate were exit polls? : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीतील 70 पैकी 48 जागांवर भाजपानं विजय मिळवलाय. आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत भोपळा फोडण्यात अपयश आलं. दिल्लीतील निकालांपूर्वी जाहीर झालेल्या बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणता एक्झिट पोल ठरला अचूक ?

प्रमुख एक्झिट पोलमध्ये 'एक्सिस माय इंडिया' (Axis My India) चा एक्झिट पोलचा अंदाज अचूक ठरला आहे. या पोलमध्ये भाजपाला 45-55 तर आम आदमी पक्षाला 15-25 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. टूडेज चाणक्यचा (Today's Chanakya) अंदाजही बरोबर ठरला आहे. त्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 45-57 तर 'आप' ला 13-25 जागा देण्यात आल्या होत्या. 

Advertisement

P-Marq एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि आघाडीला 39-49 आणि आम आदमी पक्षाला 21-31 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तर जेव्हीसीच्या (JVC) एक्झिट पोलमध्ये भाजपा 39-45 तर आम आदमी पक्षाला 22-31 जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला होता. चाणक्य स्टॅटर्जीजनुसार भाजपाला 39-44 जागा मिळतील अशी शक्यता होती. तर आम आदमी पक्षाला या  25-28 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता. 

Advertisement

( नक्की वाचा :  Delhi Election Result : 'त्यांचे शॉर्टसर्किट केले....' दिल्लीतील विजयानंतर PM मोदींना दिली 'ही' गॅरंटी )

पीपल्स इनाईट एक्झिट पोलनं भाजपाला 40-45 आणि 'आप' ला 25 ते 29 जागा दिल्या होत्या. या एक्झिट पोलचे अंदाज जवळपास बरोबर आले आहेत.

Advertisement

तर काही एक्झिट पोलनं भाजपाला मोठा विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. CNX च्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 49-61 तर आम आदमी पक्षाला 10-19 जागा दिल्या होत्या. तर पीपल्स एक्झिट पोललमध्ये NDA ला 51 ते 60 तर आम आदमी पक्षाला 10-19 जागा मिळतील असे भाकित व्यक्त करण्यात आले होते.