ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटलांमध्ये जुंपली, वैद्यकीय खर्चांवरुन आरोप-प्रत्यारोप

नवी मुंबईतील नेरुळ येथील तेरणा रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराच्या खर्चावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चांगलीच जुंपलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशिव:

नवी मुंबईतील नेरुळ येथील तेरणा रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराच्या खर्चावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चांगलीच जुंपलीय. तेरणा रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचाराच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. 

त्यावर आता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ओमराजे निंबाळकर यांना फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.

(नक्की वाचा - महायुती ठाकरे गटाचा गड भेदणार?; परभणीत संजय जाधव-महादेव जानकरांमध्ये लढत)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे दोन्ही घराणे आमने सामने आले असून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आगामी काळात याच मुद्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ओमराजे निंबाळकरांची टीका

राणा जगजितसिंह पाटील जे सांगत आहेत की, आम्ही ५० लाख रुपयांचा खर्च करुन सामन्य माणसांवर वैद्यकीय उपचार केले हे सगळं खोटं आहे. २०१२ पासून २०२३ पर्यंत या लोकांना शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून १८ कोटी २३ लाख रुपये उचलले. त्यांना माझं आव्हान आहे की यातून वैद्यकीय खर्च केलेले रुग्ण त्यांनी समोर आणावेत आणि दाखवून द्यावं की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कसा डल्ला मारला आहे, अशी टाकी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.  

Advertisement

(नक्की वाचा- भाजप उमेदवाराने शरद पवारांचे पाय धरले, पवारांनी काय आशिर्वाद दिले?)

ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपांनंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. निंबाळकर यांचे आरोप खोडून काढत त्यांच्यावर फौजदारी कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावर येणाऱ्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.